ना सलमान, ना विकी; गेली 20 वर्ष कतरिनाच्या सर्वात जवळ कोण? म्हणाली...
Photo Credit; instagram
पती विकी कौशल किंवा खास मित्र सलमान खान या दोघांनीही कतरिना कैफची जितकी काळजी घेतली नाही तितकी ही व्यक्ती घेते.
Photo Credit; instagram
20 वर्षांपासून कतरिनासोबत असलेली ही व्यक्ती दुसरी कोणी नसून कतरिनाचे पर्सनल असिस्टंट आहेत. तिने इंस्टाग्राम अकाऊंटवर अशोक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली.
Photo Credit; instagram
कतरिनाने लिहिलं, 'आज वीस वर्षे पूर्ण झाली. मिस्टर अशोक शर्मा, ही अशी व्यक्ती आहे ज्यांनी गेली 20 वर्ष माझ्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवला.'
Photo Credit; instagram
'मी सर्व गोष्टी त्यांच्यासोबत शेअर केल्या. सेटवर मला कोणी त्रास दिला तर अशोकलाही अश्रू अनावर झाले. आम्ही दोघंही या सगळ्या काळात एकत्र गेलो.'
Photo Credit; instagram
'त्यांचा नेहमीच मैत्रीपूर्ण चेहरा. नेहमी माझ्यासोबत रहा. ही अशी व्यक्ती आहे ज्यांना मी काहीही बोलण्यापूर्वी मला काय हवं आहे हे माहित असतं.'
Photo Credit; instagram
भविष्यात एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त करताना कतरिनाने पुढे लिहिलं, 'हे पुढील 20 वर्षांसाठी आहे.' अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
Photo Credit; instagram
प्रियंका चोप्रा, सोनल चौहान, निमृत कौर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी तिचे अभिनंदन केले आणि कतरिनाच्या पोस्टचे कौतुक केले.
Photo Credit; instagram
कतरिना कैफ अलीकडेच फोनभूतमध्ये दिसली होती. त्याचवेळी, ती आगामी चित्रपट टायगर 3 मध्ये सलमान खानसोबत दिसणार आहे.
एका मुलीची आई... अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन बघून बसणार नाही विश्वास