Parineeti Chopra चं लग्नाआधी खास स्वप्न पूर्ण! आता करणार 'हे' काम...
Photo Credit; instagram
राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्राच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. लग्नापूर्वी तिने तिच्या चाहत्यांसोबत मोठी बातमी शेअर केली.
Photo Credit; instagram
परिणीतीने तिच्या नव्या बिझनेसची घोषणा केली. पोस्ट शेअर करत तिने लिहिलं, 'मला अनेक वर्षांपासून उद्योजक व्हायचं आहे. माझं हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.'
Photo Credit; instagram
'तुम्हा सर्वांसोबत माझ्या पुढील व्यवसायाची घोषणा करताना मला आनंद होत आहे. पहिल्यांदा जेव्हा मी त्याचे डिझाईन्स पाहिले तेव्हा मला कळलं की, मला त्याचा ब्रँड अॅम्बेसेडर बनायचं आहे.'
Photo Credit; instagram
'यामुळेच मला #Tritiyaa सोबत गुंतवणूकदार आणि भागीदार म्हणून सामील होताना आनंद होत आहे. अनेक महिन्यांच्या नियोजन आणि मेहनतीनंतर, @kanthi_dutt आणि मी तुमच्यासाठी काही जबरदस्त गोष्टी तयार केल्या आहेत.'
Photo Credit; instagram
'माझ्यासाठी हा केवळ दागिन्यांचा व्यवसाय नाही, तर आपण आपल्या मनातून निर्माण केलेला आहे. मी खरोखरच त्या क्षणाची वाट पाहत आहे जेव्हा मी या डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर करेन. 8 सप्टेंबरला भेटू.'
Photo Credit; instagram
परिणीतीच्या या घोषणेनंतर चाहते खूप खुश दिसत आहेत.
Photo Credit; instagram
राघव आणि परिणीती याच महिन्यात उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याची बातमी आहे.
Photo Credit; instagram
23 आणि 24 सप्टेंबर रोजी हॉटेल लीला पॅलेस आणि उदयविलास येथे हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
IND-PAK सामन्याच्या 'त्या' प्रश्नावर रोहित शर्मा भडकला, Video