Priyanka chopra च्या लेकीने बाप्पाला मारली मिठी, यूजर्स म्हणाले..
Photo Credit; instagram
देशभरात अगदी धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी त्यांच्या घरी बाप्पाला घेऊन आले.
Photo Credit; instagram
पण प्रियंका चोप्राने गणेश चतुर्थीचा सण सर्वात खास पद्धतीने साजरा केला. परदेशात राहूनही प्रियांका तिची संस्कृती विसरलेली नाही.
Photo Credit; instagram
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर खास फोटो शेअर केले, ज्याच्या तुम्हीही प्रेमात पडाल.
Photo Credit; instagram
फोटोंमध्ये, प्रियांका आणि निकची एक वर्षाची मुलगी मालती मेरी तिच्या बेबी गणेश सॉफ्ट टॉयसोबत खेळताना दिसतेय.
Photo Credit; instagram
एका फोटोत छोटी मालती बाप्पाच्या सॉफ्ट टॉयला प्रेमाने मिठी मारत आहे. ती खूप क्यूट दिसतेय.
Photo Credit; instagram
कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथे असलेल्या प्रियांकाने चाहत्यांना तिच्या घरातील मंदिराची झलकही दाखवली.
Photo Credit; instagram
प्रियांकाच्या घरातील मंदिरात गणपती बाप्पा विराजमान झालेले दिसले. याशिवाय मंदिरात अनेक देवी-देवतांच्या मूर्ती स्थापित आहेत.
Photo Credit; instagram
प्रियांकाच्या पोस्टवर सर्वजण तिच्या मुलीच्या संस्कारांचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिलं, 'तुमचा अभिमान आहे की तुम्ही तुमच्या मुलीला भारतीय संस्कृतीने वाढवत आहात. '