Arrow

अभिनेता सुनील शेट्टीला बसली महागाईची झळ, टोमॅटो खाणे...

Arrow

टोमॅटोचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या किचनमधून टोमॅटो गायब झाले आहेत.

Arrow

सर्वसामान्यांना टोमॅटोच्या दरवाढीचा फटका बसत असताना यामध्ये अभिनेतेही मागे राहिले नाही आहेत. 

Arrow

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने टोमॅटोच्या वाढत्या दरावर प्रतिक्रिया दिली आहे.

Arrow

माझी बायको घरी फक्त एक-दोन दिवस भाजी आणते. ताज्या भाज्या खाण्यावर आमचा भर असतो. 

Arrow

 टोमॅटोच्या दरवाढीचा परिणाम माझ्या घराच्या किचनवरही झाला. मी सध्याच्या दिवसात टोमॅटो खायला कमी केले आहे. 

Arrow

चाहत्यांना वाटते की, सुपरस्टार असल्याने महागाईच्या झळा बसत नाही,पण तसे नाही आम्हालाही फटका बसतो. 

Arrow

मी एका अ‍ॅपच्या माध्यमातून भाज्या मागवतो. ज्याचे दर पाहून तुम्ही हैराण व्हालं. 

Arrow

या अ‍ॅपवर स्वस्त भाज्या मिळतात, त्यामुळे तिथून मी भाज्या खरेदी करतो. 

Arrow

मी या अ‍ॅपवर भाज्या यासाठी खरेदी करतो, कारण याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळतो.

Arrow

चाहत्यांना वाटते की, अभिनेता असल्याने महागाईची जाणीव नसेल, पण आम्हाला याची उलट अधिक माहिती असते.

Arrow

 मी एक अभिनेत्याबरोबर एक हॉटेलवाला देखील आहे, त्यामुळे सर्व गोष्टीचा भाव करावा लागतो.

Arrow

टोमॅटोचे भाव वाढल्याने चवीबाबत तडजोड करावी लागेल. मी पण करतोय असे सुनील म्हणाला आहे.

Arrow

खंडाळ्याच्या फार्म हाऊसमध्ये अनेक भाज्या लावल्या आहेत. रविवार माझा फार्म हाऊसच्या देखभालीत जातो.

Arrow

अभिनेता असलो तरी साधे जीवन जगण्यावर माझा विश्वास असल्याचे सुनील शेट्टी सांगतो.

iphone 14 वर बंपर ऑफर मिळणार जबरदस्त डिस्काउंट!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा