जे कुणाला नाही जमलं, ते Rohit Sharma ने केलं, केला मोठा विक्रम!
Photo Credit; instagram
आशिया चषक 2023 च्या सुपर फोर सामन्यात भारताने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. अशा प्रकारे भारताने अंतिम फेरीत धडक मारली.
Photo Credit; instagram
213 धावा केल्यानंतर टीम इंडिया एकवेळ अडचणीत आली होती. पण भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत श्रीलंकेला १७२ धावांत गुंडाळून विजय मिळवला.
Photo Credit; instagram
टीम इंडियाने आशिया कपच्या वनडे फॉरमॅटमध्ये नवव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. आता 17 सप्टेंबरला टीम इंडियाचा अंतिम सामना श्रीलंका किंवा पाकिस्तानशी होणार आहे.
Photo Credit; instagram
रोहितने फायनलपूर्वीच कर्णधारपद सिद्ध केलं. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुसऱ्यांदा आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला.
Photo Credit; instagram
2018 मध्ये भारताने आशिया कप जिंकला तेव्हा रोहित कर्णधार होता. विशेष म्हणजे, रोहित कर्णधार असताना, एकदिवसीय फॉरमॅटच्या आशिया चषकात भारताचा पराभव झालेला नाही.
Photo Credit; instagram
रोहितने गेल्या पाच वर्षांत आशिया कपच्या दोन एडिशनमध्ये नऊ सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले. यातील आठ सामने जिंकले.
Photo Credit; instagram
२ सप्टेंबरला पाकिस्तानविरूद्धचा सामना पावसामुळे निकालापर्यंत पोहोचू शकला नाही.
Photo Credit; instagram
तसंच, आजपर्यंत एकदिवसीय इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाचा अंतिम सामना झाला नाही. अशा वेळी 17 सप्टेंबरला हा संघर्ष होऊ शकतो.