Arrow

व्हिस्कीची कधी बनते स्कॉच ? मद्यप्रेमींनाही याचे उत्तर नसेल माहित...

Arrow

मद्यपान करणारी माणसं व्हिस्कीचे दोन प्रकार मानतात. त्यामध्ये एक असते देशी आणि दुसरे असते विदेशी.

Arrow

एक प्रकारे व्हिस्कीचा अर्थ समजून घेणे तसं सोपं नाही, मात्र तरीही त्याची उस्तुकता अनेक लोकांमध्ये असते. त्या उत्सुकतेमुळेच भारतीय लोकांमध्ये स्कॉच हा प्रकार लोकप्रिय झाला आहे.

Arrow

ज्यावेळी कोणतीही व्हिस्की स्कॉटलंडमध्ये बनवली जाते तेव्हा त्याला स्कॉच म्हणतात, मात्र ती जर स्कॉटलंडमध्ये बनवली गेली नाही तर मात्र त्याला स्कॉच म्हटले जात नाही. 

Arrow

कोणतीही व्हिस्की स्कॉटलंडमध्ये बनवली म्हणून ती व्हिस्की होतेच असं नाही. तर त्यासाठी ती ज्या प्रकारे मुरवली जाते, त्या दीर्घकाळ मुरवण्याच्या पद्धतीमुळेच नंतर तिला स्कॉचचा दर्जा दिला जातो.

Arrow

स्कॉच बनवण्यासाठी व्हिस्की ही काही वर्षांसाठी आणि ती मुरवण्यासाठी दीर्घकाळ एका डब्यात साठवली जाते. त्यामुळेच स्कॉचच्या कोणत्याही बॉटलवर 5 वर्षे, 12 आणि 15 वर्षे असं लिहिलेले तुम्हाला पाहायला मिळते.

Arrow

स्कॉच तयार करण्यासाठी दीर्घकाळ ती एकाच डब्यात ठेवली जाते. त्यामुळे ती चांगल्या प्रकारे मुरली जाते. ती ज्या पद्धतीने मुरवली जाते, त्यामुळेच स्कॉचला एक वेगळ्या प्रकारची चव निर्माण होते. स्कॉचच्या या खास वैशिष्ट्यामुळेच व्हिस्कीपेक्षा स्कॉच अधिक महाग असते.

Arrow

आहार आणि वाईन तज्ज्ञांच्या मतानुसार ही माहिती देण्यात आली आहे. ( हे वृत्त मद्यपानाला कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन देत नाही.)

Sehar Shinwari : भारताच्या पराभवाची प्रार्थना करणारी ‘ती’ पाकिस्तानी अभिनेत्री कोण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा