अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
Photo Credit; instagram
यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भवितव्याबाबत वक्तव्य केलं.
Photo Credit; instagram
शरद पवार म्हणाले, 'दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीबद्दल उल्लेख केला होता. त्यांनी आपल्या निवेदनात दोन गोष्टी सांगितल्या.'
Photo Credit; instagram
'एक म्हणजे राष्ट्रवादी हा संपलेला पक्ष आहे आणि दुसरे म्हणजे पाटबंधारे खात्यातील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा त्यांनी उल्लेख केला.'
Photo Credit; instagram
'माझ्या काही सहकाऱ्यांनी शपथ घेतली याचा मला आनंद आहे. ते सरकारमध्ये सामील झाल्यामुळे ते सर्व आरोपातून मुक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.'
Photo Credit; instagram
पुढे पवार म्हणाले, 'विविध राज्यातील नेत्यांचे मला फोन येत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतरांनी मला फोन केला आहे.'
Photo Credit; instagram
'आज जे काही झाले त्याची मला चिंता नाही. उद्या मी यशवंतराव चव्हाण यांचे आशीर्वाद घेईन आणि जाहीर सभा घेईन.'
Photo Credit; instagram
यानंतर राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण? असा शरद पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी 'शरद पवार' असं स्वत:चच नाव घेतलं.
'भाजपचा नवा टेकू' अजित पवारांच्या बंडानंतर, संजय राऊतांचे टीकास्त्र!