Video: आरारारा खतरनाक! लग्नाचा खर्च वाचवला, देशी जुगाड करून DJ बनवला, पाहुणे म्हणतील 'बजाओ'...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mini DJ On Bike Viral Video
Man makes mini dj with XL Bike
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मिनी DJ च्या देशी जुगाडाचा व्हायरल व्हिडीओ पाहून थक्कच व्हाल

point

लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी पठ्ठ्याने केल भन्नाट जुगाड

point

बाईकवर सेट केलेल्या मिनी DJ चा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Mini DJ Desi Jugaad Video Viral : येत्या काही दिवसात लग्न सराईचा हंगाम सुरु होणार आहे. अशातच सोशल मीडियावर लग्नाचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण लग्नात डीजेची मागणी तर गगनालाच पोहोचलेली असते. लग्नमंडपात नाचून हंगामा करणाऱ्या पाहुण्यांसाठीही हा मिनी डीजे फायदेशीर ठरणार आहे. लग्नसोहळ्यात मोठ मोठे स्पीकरचा डीजे वाजवला जातो. पण तुम्ही XL बाईक डीजेबद्दल कधी ऐकलं आहे का? तुम्हाला जर या डीजेबाबत काही माहितीच नसेल, तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मिनी डीजेचा व्हिडीओ तुम्ही नक्कीच पाहू शकता. (The wedding season will begin in the next few days. In this way, amazing wedding and desi jugaad videos  are going viral on social media)

ADVERTISEMENT

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या मिनी डिजेच्या व्हिडीओत पाहू शकता की, एका मोपेडवर दोन मोठे स्पीकर बांधलेले आहेत. त्यांच्यावर चकचकणाऱ्या लाईट्सही लावण्यात आल्या आहेत. म्युजिक सुरु होताच या लाईट्स चमकत असल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या वाहनांवर ज्या प्रकारे मोठे स्पीकर्स लावले जातात, अशा प्रकारचा हा डीजे असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी याला मिनी डिजे असं म्हणत आहेत.या इन्स्टाग्राम रिलला सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलं आहे.

हे ही वाचा >> डॉली चायवाल्याचं आता काय खरं नाय! मार्केटमध्ये उतरली 'मॉडेल चायवाली', VIDEO तुफान व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहू शकता की, XL बाईकच्या मागच्या सीटवर मोठ मोठे स्पीकर एकत्रितपणे बांधले आहेत. बाईकवर जबरदस्त लाईट्सही लावण्यात आले आहेत. म्युजिक सुरु होताच या लाईटस् लख्ख प्रकाशात चमकत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. बाईकच्या नंबर प्लेटकडे पाहिलं, तर हा व्हिडीओ आंध्रप्रदेश AP चा असू शकतो. 

इथे पाहा मिनी DJ च्या देशी जुगाडाचा व्हायरल व्हिडीओ

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Boini Nithin (@boini5066)

इन्स्टाग्रामवर या रीलला @boini5066 नावाच्या यूजरने शेअर केलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 6 मिलियन लोकांनी पाहिलं आहे आणि 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओला लोकांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने म्हटलंय, ही XL बाईक नाही. तर डीजे व्हेईकल आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, हा मिनी डीजे आहे. 

हे ही वाचा >>  Viral Video: विमानात अचानक सर्व स्क्रीनवर सुरु झाली 'Adult Film', प्रवाशांनी पॉज करण्याचा प्रयत्न केला पण...

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT