“हिंदू महिला आणि मुस्लिम पुरुषांमधील संबंध वाढवण्यासाठी गरबा...”, बजरंग दलाच्या आरोपावरून राडा! घडलं काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

इंदूरमध्ये बजरंग दलाकडून गरब्याचे आयोजन रद्द

point

नेमकं असं काय घडलं?

point

आयोजक फिरोज खान यांचे आवाहन

Garba Cancelled in Indore by Bajrang Dal : देशभरात नवरात्रोत्सवाचा चांगलाच धुमधडाका सुरू आहे. कालपासून म्हणजेच गुरूवारी 03 ऑक्टोबर 2024 रोजी नवरात्रीला सुरूवात झाली. पण या सर्वात एक धार्मिक वाद चर्चेत आला आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी गरबा कार्यक्रम रद्द करण्यात आला. बजरंग दलाकडून एक मोठा दावा करण्यात आल्यामुळे गरब्याचं आयोजन रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. (Bajrang Dal cancelled garba program in Indore accusing Muslim organizer of love jihad)

ADVERTISEMENT

नेमकं असं काय घडलं?

इंदूरमधील भवरकुवा परिसरात गेल्या 35 वर्षांपासून नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे आयोजक फिरोज खान होते. त्यांच्यावर बजरंग दलाकडून लव्ह जिहादचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. “या कार्यक्रमाचा उपयोग हिंदू महिला आणि मुस्लीम पुरुषांमधील संबंध वाढवण्यासाठी केला जातो”, असा आरोप स्थानिक बजरंग दलाने केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली आहे.

तर, विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) स्थानिक नेते राजेश बिंजवे यांनी सांगितले की, बजरंग दलाने भवरकुवा पोलिसांना निवेदन सादर केले. 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अश्लीलता पसरवण्यासाठी गणेश नगरमध्ये हा 10 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

त्यांनी सांगितले की, बजरंग दलानेच पोलिसांना शिखर गरबा मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची विनंती केली होती. कारण फिरोज खान नावाची व्यक्ती या गरबा इव्हेंटशी जोडली गेली होती.

हेही वाचा : Mumbai Rape Case: याला बाप म्हणावंं की सैतान... नराधम सलग 5 वर्ष मुलीवर करत होता बलात्कार!

बजरंग दलाने सादर केले निवेदन

अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश दंडोतिया यांनीही गरबा आयोजित करण्याविरोधात बजरंग दलाकडून निवेदन प्राप्त झाल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी आयोजकांनी पोलिसांची परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. हा गरबा आयोजित करण्यासाठी कोणी परवानगी मागितल्यास कायद्यानुसार त्याचा विचार केला जाईल, असेही ते पुढे म्हणाले.

ADVERTISEMENT

आयोजक फिरोज खान यांचे आवाहन

मात्र, या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून परवानगी मिळाल्याचे फिरोज खान यांनी सांगितले. ते म्हणाले, “जिथे गरबा कार्यक्रम होणार होता त्या जागेच्या मालकावर अवाजवी दबाव टाकण्यात आला. गेल्या 35 वर्षांपासून येथे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. मी 25 वर्षांपासून या कार्यक्रमाच्या कामासाठी गुंतलो आहे आणि गेल्या 15 वर्षांपासून मी स्वतः या कार्यक्रमाचं नियोजन करतोय. आम्हाला यापूर्वी कधीही अशा समस्येचा सामना करावा लागला नाही. पहिल्यांदाच काही लोकांना या कार्यक्रमात अडचण येत आहे कारण मी मुस्लिम आहे.”

ADVERTISEMENT

या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांनी तसे करू नये, असे आवाहन फिरोज खान यांनी केले आहे. त्यांना कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी द्यावी, असे ते म्हणाले. जेणेकरून गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करणाऱ्या 250 ते 300 महिलांना सादरीकरणाची संधी मिळू शकेल. ते म्हणाले, “लोकांना माझ्या नावाची अडचण असेल तर मी गरबा पंडालमध्ये पाऊल ठेवणार नाही.” ते पुढे म्हणाले की, त्यांच्या परिसरात ते एकमेव मुस्लिम असून ईदप्रमाणेच दिवाळीही मोठ्या थाटामाटात साजरी करतात. 

हेही वाचा : Gold-Silver Price: सोन्याचा तर विषयच हार्ड! किंमतीही धमाकेदार... आजचे भाव किती रूपयांनी वाढले?

दुसरे आयोजक दीपक हरदिया म्हणाले, “आमचा पंडाल सजला होता आणि तयार होता. पंडालमध्ये दुर्गादेवीची मूर्ती बसवायची जागाही आम्ही ठरवली होती. पण आम्हाला धार्मिक कार्यक्रमात कोणताही वाद नको आहे, म्हणून आम्ही पंडाल काढून कार्यक्रम रद्द केला. फिरोज खान हे त्यांच्या समितीतील एकमेव मुस्लिम व्यक्ती आहेत आणि ते वयाच्या ८ व्या वर्षापासून हिंदू कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT