Mumbai Rape Case: याला बाप म्हणावंं की सैतान... नराधम सलग 5 वर्ष मुलीवर करत होता बलात्कार!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ताडदेव पोलीस ठाण्यात बापाने दाखल केली मुलीच्या अपहरणाची तक्रार

point

नेमकं काय आहे प्रकरण?

point

जन्मदाता बापच गेल्या पाच वर्षांपासून करत होता अत्याचार

Mumbai Rape Case : आपल्या लेकीला घरी यायला थोडा जरी उशीर झाला तरी पालकांची धाकधूक वाढते. अशात जर लेक बेपत्ता झाली तर पालकांची मनःस्थिती कशी असेल हे तुम्हाला चांगलंच समजू शकतं. नुकतीच मुंबईत एक अशीच घटना उघडकीस आली जेव्हा एका व्यक्तीने आपली 17 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीत ठाण्यात दाखल केली. ही सामान्य घटना वाटत असली तरी तपासादरम्यान पोलिसांना जे समजलं ते धक्कादायक होतं. (mumbai crime news taddeo rape case father raped his 17 years daughter for continue 5 years know about the case in detail)

ADVERTISEMENT

नेमकं काय आहे प्रकरण?

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मुंबई ताडदेव परिसरातील आहे. जेव्हा एक व्यक्ती ताडदेव पोलीस ठाण्यात आला तेव्हा त्याने आपल्या मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. आपल्या 17 वर्षीय मुलीला कुणीतरी लग्नाचे आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेल्याचे 46 वर्षीय पित्याने सांगितले.

त्याच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू करण्यात आला. शोध सुरू असताना, गुन्हे शाखेच्या पथकाला पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी स्थानकावर मुलगी सापडली. मुलीला ताबडतोब गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले, जिथे चौकशीदरम्यान तिने जे काही सांगितलं ते ऐकून पोलिसांच्याही तळपायाची आग मस्तकात गेली. 

हेही वाचा : Pune Gangrape : संतापजनक! बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या 21 वर्षीय तरूणीवर गँगरेप 

तरुणीने दिलेल्या जबाबातून, जन्मदाता बाप गेल्या पाच वर्षांपासून तिचा लैंगिक छळ करत असल्याचे समोर आले. या त्रासापासून वाचण्यासाठी तिने घर सोडले होते. पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारे, तिच्या वडिलांविरुद्ध पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरूवातीला पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन तिची आपुलकीने विचारपूस केली. पण ती काहीही सांगण्याच्या मनःस्थितीत नव्हती. मात्र नंतर तिने सांगितलेली आपबिती ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. 'वडील लैंगिक अत्याचार करत होते. हे सर्व असह्य झालं होतं, बदनामी आणि मारहाणीच्या भीतीने याबद्दल कुणाला सांगताही येत नव्हतं,' असं मुलीने पोलिसांना सांगितलं. यानंतर आता बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या पीडितेच्या पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.
 

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT