Fake Sex Racket: 'तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये सापडली...', हे शब्द ऐकताच आईचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

'तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये सापडली...'
'तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये सापडली...'
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकल्याचे सांगून पैसे उकळण्याचा प्रयत्न

point

खंडणीखोराच्या फोनमुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू

point

सेक्स रॅकेटमध्ये मुलीची नाव घेतल्याने महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Sex Racket Crime News: आग्रा: एका सरकारी शाळेतील शिक्षिकेला तब्बल चार तास डिजिटल अटकेत ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या ड्रेसमध्ये एका आरोपीने व्हॉट्सॲप कॉल करून सांगितले की, तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकली आहे. तुम्हाला तिची सुटका करायची असेल तर 15 मिनिटांत 1 लाख रुपये पाठवा. अन्यथा तिटे व्हिडीओ व्हायरल होतील. ज्यानंतर आरोपीने 'मम्मी, मला वाचवा' असा ओरडण्याचा आवाजही ऐकवला. ज्याचा धक्का महिला शिक्षिकेला बसला आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण आता समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. (your daughter has been caught in a sex racket a female teacher dies of a heart attack after listening to a phone call from thugs)

ADVERTISEMENT

आरोपीने जेव्हा फोनवरून शिक्षिकेला धमकी दिली तेव्हा तिला प्रचंड धक्का बसला आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मालती वर्मा (वय 58 वर्ष) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या एका सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. दरम्यान, या घटनेनंतर मृत मालती यांच्या घरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

हे ही वाचा>> वापरलेले कंडोम सापडले अन् पोलिसांनी 'त्या' गुन्ह्यात आई-मुलाला केली अटक!

महिला शिक्षिकेला 4 तास ठेवलेलं डिजिटल अटकेत 

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, 30 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांना व्हॉट्सॲप कॉल आला. डीपीवर पोलिसांच्या गणवेशातील कोणाचा तरी फोटो होता. जेव्हा मालती यांनी फोन उचलला तेव्हा आरोपीने त्यांना सांगितले की, तुमची मुलगी सेक्स स्कँडलमध्ये अडकली आहे. जर तुम्हाला तिला वाचवायचे असेल तर मी सांगतो तसे करा. हे ऐकून मालती यांना मोठा धक्का बसला.

हे ही वाचा>> Riya Barde: उल्हासनगरमधून अटक केलेली पॉर्न स्टार रिया बर्डे कोण? 

व्हॉट्सॲपवर कॉलवरून खंडणी मागितली 

मृत महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, मालती यांनी त्याला फोनवरून या घटनेची माहिती सांगितली होती. आरोपीने आपल्याकडे एक लाख रुपये मागितल्याचेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान ज्या फोनवरून फोन आला होता त्याचा कोड +92 आहे. जो पाकिस्तानचा आहे. 

याप्रकरणी एसीपी मयंक तिवारी यांनी सांगितले की, मालती यांचा मृत्यू 30 सप्टेंबर रोजी झाला असून याप्रकरणी आज तक्रार करण्यात आली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT