Bigg Boss 18: "मुंबईवर मी राज करतो, उद्धव ठाकरे आणि शरद पवार..", गुणरत्न सदावर्तेंनी फोडला राजकीय बॉम्ब
Gunratna Sadavarte On Uddhav Thackeray And Sharad Pawar : प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी हिंदी बिग बॉसचा 18 वा सीजन सुरु झाला आहे. या बिग बॉसच्या सीजनमध्ये वकील गुणरत्न सदावर्तेंची धडाकेबाज एन्ट्रीने तमाम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बिग बॉसच्या घरात गुणरत्न सदावर्तेंचं बड्या नेत्यांबाबत मोठं वक्तव्य
बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताच सदावर्ते कडाडले
गुणरत्न सदावर्ते उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबाबत नेमकं काय म्हणाले?
Gunratna Sadavarte On Uddhav Thackeray And Sharad Pawar : सूरज चव्हाणने मराठी बिग बॉस सीजन 5 च्या ट्रॉफीवर जेतेपदाचं नाव कोरलं. मराठी बिग बॉसचा समारोप सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. परंतु, आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी हिंदी बिग बॉसचा 18 वा सीजन सुरु झाला आहे. या बिग बॉसच्या सीजनमध्ये वकील गुणरत्न सदावर्तेंची धडाकेबाज एन्ट्रीने तमाम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ((The 18th season of Bigg Boss Hindi has started to dominate the minds of the audience. Lawyer Gunaratna Sadavarte entry in this season of Bigg Boss has caught the attention of all the viewers)
ADVERTISEMENT
बिग बॉसच्या या घरात वकील गुणरत्न सदावर्तेंनी एन्ट्री केल्यापासून प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन होत आहे. गुणरत्न सदावर्तेंची हटके स्टाईक आणि बेधडक वक्तव्य बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध करत आहे. अशातच गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. सदावर्तेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.
हे ही वाचा >> Horoscope In Marathi : 'या' व्यक्तींच्या संपत्तीत होईल भरमसाट वाढ! नवरात्रीच्या सातव्या दिवशी कुणा कुणाचं नशीब चमकणार?
उद्धव ठाकरे-शरद पवारांबाबत बोलताना सदावर्ते काय म्हणाले?
बिग बॉसच्या घरात धडाकेबाज एन्ट्री करताच गुणरत्न सदावर्तेंनी इतर स्पर्धकांशी संवाद साधला. यावेळी सदावर्ते म्हणाले, "बग्गाजी मी आलो. माझ्या मुलाचं लग्न आहे. म्हणून मी अशा स्टाईलचा चष्मा घातला आहे. आमच्याशी नडण्याची कोणत्या मायकलालची ताकद आहे का? मुंबईवर मी राज करतोय. तुम्ही कलाकार आहात.
तुम्ही कला दाखवता. आम्ही राज करतो. आम्ही डाकू लोकांच्या कुटुंबातून आलो आहोत. बिग बॉसच्या घरात एका स्पर्धकाने गुणरत्न यांना विचारलं की, तुम्ही मुंबईत कुठे राहता? यावर गुणरत्न म्हणाले, मी दादरच्या हिंदमाता येथे राहतो. मुंबईत तीनच शक्तीकेंद्र आहेत. एक उद्धव ठाकरे, दुसरा शरद पवार आणि तिसरं गुणरत्न सदावर्तेंचा आहे. एक गुणरत्न लाख गुणरत्न बोलतात."
हे ही वाचा >> Maharashtra Weather: महाराष्ट्रावर दुहेरी संकट! हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना इशारा
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT