Haryana Election Result: विनेश फोगाटचा मोठा विजय, पण ब्रिजभूषण सिंह 'हे' काय बोलून गेले...
Brij Bhushan Sharan Singh: काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगाट हिने विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. पण याचबाबत बोलताना ब्रिजभूषण सिंह यांनी जहरी टीका केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
हरियाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगाटचा विजय
कुस्तीपटू विनेश फोगाटने काँग्रेसच्या तिकिटावर लढवली निवडणूक
विनेश फोगाटच्या विजयानंतर ब्रिजभूषण शरण सिंहांची जहरी टीका
Brij Bhushan Sharan Singh vs Vinesh Phogat: हरियाणा: हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी त्यांनी कुस्तीपटू आणि काँग्रेस उमेदवार विनेश फोगट यांच्या विजयाबाबत बोलताना जहरी टीका केली आहे. 'भले ती जिंकली असेल पण काँग्रेसचा नायनाट झाला आहे.' (haryana election result 2024 brij bhushan singh took a dig at vinesh phogat victory said congress has been completely destroyed)
ADVERTISEMENT
याशिवाय ब्रिजभूषण म्हणाले की, 'ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या नावावर, पैलवानांच्या नावावर भ्रमित करण्याचा प्रयत्न झाला.. पण तो जनतेने नाकारला.' असे ते म्हणाले.
ब्रिजभूषण शरण सिंहांची जहरी टीका
काँग्रेसचा नायनाट कशामुळे झाला, असे विचारले असता? ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विनेश फोगटचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, 'ती (विनेश) तर काय जिंकणारच होती.. ती इथेही (कुस्ती) बेईमानीने जिंकायची आणि आता तिथेही जिंकली. मात्र तिच्या विजयाच्या नादात काँग्रेसचा पराभव झाला. हे जिंकणारे कुस्तीपटू हिरो नसून खलनायक आहेत.' अशी घणाघाती टीका ब्रिजभूषण सिंह यांनी केली आहे.
हे ही वाचा>> Election Results 2024: हरियाणात BJP चा उलटफेर, काश्मीरमध्ये काय घडतंय?
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक कनिष्ठ महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करून गेल्या वर्षी दिल्लीतील जंतरमंतरवर जोरदार आंदोलन केलं होतं. ज्यामध्ये कुस्तीपटूंमध्ये विनेश फोगटचा समावेश होता. कुस्तीपटूंच्या आरोपानंतर भारतीय कुस्ती विश्वात खळबळ उडाली होती. भाजपने ब्रिजभूषण सिंह यांचे तिकीट रद्द करून त्यांच्या मुलाला लोकसभेचं तिकीट दिलं होतं. ब्रिजभूषण यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाचा खटला अजूनही न्यायालयात सुरू आहे.
कुस्तीपटू विनेश फोगट हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून विजयी झाली आहे. तिने भाजपचे कॅप्टन योगेश बैरागी यांचा 6 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. विनेशची ही पहिलीच निवडणूक होती. मात्र, तिचा पक्ष (काँग्रेस) निवडणुकीत सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Harshavardhan Patil : ''सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृष्य सहभाग'', हर्षवर्धन पाटलांचं मोठं विधान
दुपारी 5 वाजेपर्यंतचे निकाल पाहता हरियाणात भाजप हॅटट्रिक करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा एक विक्रम आहे, कारण हरियाणात कोणत्याही पक्षाने सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकलेली नाही. इतकेच नाही तर हरियाणाच्या इतिहासातील ही भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. भाजपला यापूर्वी कधीही ५० चा आकडा गाठता आलेला नाही.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT