Today Gold Price: लय भारी... सोनं झालं स्वस्त, तब्बल 4500 रुपयांची घसरण

आजचा सोन्याचा भाव: सोने आणि चांदीच्या किमतीत घट झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरपासून आतापर्यंत सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे 22,650 रुपयांनी महाग झाले आहे.

Today Gold Price (फोटो सौजन्य: Grok)

Today Gold Price (फोटो सौजन्य: Grok)

मुंबई तक

• 08:31 PM • 25 Apr 2025

follow google news

मुंबई: सोन्यासाठी हा आठवडा ऐतिहासिक होता. मंगळवारी सोन्यासाठी एवढी चांगली गोष्ट होती की किंमत ऐतिहासिक पातळीवर पोहोचलेली. सोन्याची किंमत लाखो रुपयांची झाली होती. त्याच वेळी, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी सोन्याचे भाव 4500 रुपयांनी घसरले. सोन्याचा भाव आता 95,631 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. दुसरीकडे, चांदीचा भाव 50 रुपयांनी घसरून 97,684 रुपये प्रति किलो झाला आहे.

हे वाचलं का?

सोने आणि चांदीच्या किंमतीत घट झाल्यामुळे खरेदीदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जर आपण पाहिले तर गेल्या वर्षी डिसेंबरपासून आतापर्यंत सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे 22,650 रुपयांनी महाग झाले आहे. सोन्यातील ही महागाई 29 टक्क्यांच्या जवळपास आहे.

हे ही वाचा>> Personal Finance: Quick Loan Apps च्या नादात बरबाद व्हाल, 'या' Tips ठेवा लक्षात

लग्न आणि अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोने खरेदीदारांसाठी चिंतेचा विषय बनत असताना, ज्वेलर्स मार्केटमधील आकर्षणही कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

सराफा बाजारात उदासीचं वातावरण

सोने आणि चांदी व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे लोकांचा सोन्यातील रस कमी होत चालला आहे. जे पूर्वी 10 ग्रॅम सोने खरेदी करायचे ते आता फक्त 5 ग्रॅम सोने खरेदी करत आहेत. लग्नसराईच्या काळातही सोन्याच्या खरेदीत घट दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

1. मुंबई

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98,240 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90,050 रुपये झाले आहेत.

2. पुणे

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98,240 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90,050 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा>> Personal Finance: अवघ्या काही मिनिटांत मिळेल 15 लाखांपर्यंत Personal Loan, 'या' डिजिटल प्लॅटफॉर्मकडून मोठी घोषणा

3. नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98,270 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90080 रुपये झाले आहेत. 

4. जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98,240 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90,050 रुपये झाले आहेत.

5. छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98,240 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90,050 रुपये झाले आहेत.

6. कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98,240 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90,050 रुपये झाले आहेत.

7. नागपूर

नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98,240 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90,050 रुपये झाले आहेत.

8. सोलापूर

सोलापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98,240 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90,050 रुपये झाले आहेत.

9. रत्नागिरी

रत्नागिरीमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98,240 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90,050 रुपये झाले आहेत.

    follow whatsapp