Personal Finance: 25 वर्षांचं Home Loan केवळ 10 वर्षात फिटेल, पण नेमकं कसं? फक्त 3 Tips ठेवा लक्षात!

आजच्या काळात स्वत:चं घर असणं हे प्रत्येकांचं स्वप्न असतं. यासाठी अनेकजण होम लोन म्हणजेच गृहकर्ज काढतात. मात्र, यामुळे महिन्याचा पागाराचा सगळ्यात मोठा हिस्सा हा EMI भरण्यासाठी जातो. यासाठी काही सोप्या टिप्स वापरुन दर महिन्याला होणारा EMI साठीचा खर्च कमी केला जाऊ शकतो.

25 वर्षांचं Home Loan केवळ 10 वर्षात फिटेल

25 वर्षांचं Home Loan केवळ 10 वर्षात फिटेल

मुंबई तक

27 Apr 2025 (अपडेटेड: 27 Apr 2025, 08:46 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गृहकर्ज (होम लोन) चा खर्च कमी करण्यासाठी टिप्स

point

25 वर्षांचं होम लोन 10 वर्षांतच कसं क्लोज करावं?

point

गृहकर्जाचा कालावधी कसा कमी होईल?

Home loan: सध्याच्या काळात स्वत:चं घर असणं हे सर्वात महागडं स्वप्नांपैकी एक असल्याचं सांगितलं जातं. हे स्वप्न साकार करण्यासाठी लोकांना कर्ज म्हणजेच (Home Loan) घेण्याची गरज भासते. मात्र, यामुळे महिन्याचा पागाराचा सगळ्यात मोठा हिस्सा हा EMI भरण्यासाठी जातो. अशा परिस्थितीत, हे होम लोन लवकर संपावं असं प्रत्येकालाच वाटतं. यासाठी काही सोप्या टिप्स वापरुन दर महिन्याला होणारा EMI साठीचा खर्च आणि त्याचं ओझं अगदी बऱ्याच प्रमाणात कमी केलं जाऊ शकतं. याच्या 3 सोप्या टिप्स नक्की जाणून घ्या.

हे वाचलं का?

50 लाखांचं लोन आणि 40000 रुपयांचं EMI

आता असं समजा की तुम्ही 25 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचं होम लोन म्हणजेच गृहकर्ज घेतलं आहे. हे कर्ज तुम्हाला बँकेने 8.5 टक्के व्याजदराने दिले आहे आणि त्यानुसार तुमचा दर महिन्याचा EMI 40000 रुपये आहे. सुरुवातीच्या वर्षांप्रमाणे बँक तुमच्या कर्जावर जास्त व्याज आकारते. याचा अर्थ असा की 40000 रुपयांच्या EMI द्वारे तुम्ही 4.80 लाख रुपयांचे पेमेंट करता, परंतु तुमच्या कर्जाची मूळ रक्कम फक्त 60000 रुपयांनी कमी होते आणि 4.20 लाख रुपये फक्त व्याज भरण्यासाठी खर्च होतात.

हे ही वाचा: Minimum Amount Due in Credit Card: क्रेडिट कार्डच्या 'MAD' पेमेंटपासून सावधान! नाहीतर, खिशाला लागेल कात्री

पहिला मार्ग

जर तुम्हाला हे 25 वर्षांचे गृहकर्ज फक्त 10 वर्षात पूर्ण करायचे असेल, तर तुम्हाला योग्य स्ट्रॅटजी वापरून पैसे द्यावे लागतील. त्याची पहिली स्टेप म्हणजे तुम्ही दरवर्षी एक अतिरिक्त EMI भरावा म्हणजेच मासिक हप्त्याव्यतिरिक्त, 40000 रुपये अतिरिक्त पेमेंट करावे.

दुसरा मार्ग

यासाठी तुम्हाला दरवर्षी तुमचा EMI 7.5 टक्के दराने वाढवावा लागेल आणि असे केल्याने तुमच्या कर्जाचा कालावधी 25 वर्षांवरून फक्त 12 वर्षांपर्यंत कमी होईल. अशा पद्धतीने तुमचा फायदा होईल. तुमच्या कर्जाच्या कालावधीत घट झाल्यामुळे तुम्हाला कमी कालावधीसाठी कमी रक्कम भरावी लागेल आणि तुम्ही लवकरच कर्जाच्या त्रासातून बाहेर पडू शकाल.

हे ही वाचा: UPSC Archit Dongre: मराठमोळा अर्चित डोंगरेने UPSC साठी IT कंपनीतील नोकरी सोडली, अन् देशात आला तिसरा!

तिसरा मार्ग

आता आपण तुम्हाला तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या मार्गाबद्दल जाणून घेऊया. या स्ट्रॅटजीचा अवलंब करून तुम्ही तुमचं 25 वर्षांचं लोन फक्त 10 वर्षांतच क्लोज करू शकता. खरंतर, जर तुम्ही दरवर्षी 40000 रुपयांचा अतिरिक्त हप्ता जमा केला आणि दरवर्षी 7.5 टक्क्यांनी EMI वाढवला, तर तुमचा कर्जाचा कालावधी फक्त 10 वर्षांपर्यंत कमी होईल.

Personal Finance सीरीजमधील या बातम्याही वाचा:

1. Personal Finance: शेअर बाजाराची भीती वाटते? तर Gold ETF मध्ये गुंतवा पैसे, 10 हजार रुपयात व्हाल करोडपती!

2. पैसा-पाणी: भारतीयांना सोन्याचं व्यसन, सरकारने मानली हार.. 3 मोठ्या योजना अपयशी!

3. Personal Finance: ATM मधून पैसे काढणे होणार महाग, 1 मे पासून मोजावे लागणार 'एवढे' पैसे

4. Personal Finance: घर खरेदी करावं की भाड्याने घ्यावं.. काय चूक, काय बरोबर? 'हा' फॉर्म्युला ठेवा लक्षात?

5. Personal Finance तुम्हाला मिळतील 4 कोटी, फक्त SNP हा प्लॅन ठेवा लक्षात.. हाती येईल प्रचंड पैसा!

6. Personal Finance: FD पेक्षा जास्त मिळतील पैसे, 'ही' जबरदस्त योजना तुम्हाला माहिती आहे का?

7. Personal Finance: जर तुम्हाला घरबसल्या PF चे पैसे हवे तर फक्त 'एवढंच' करा.., थेट तुमच्या खात्यात पैसे

8. गुड न्यूज: तुमचा घराचा हप्ता होणार कमी, EMI भरताना 'एवढे' पैसे वाचणार!

9. Personal Finance: शेअर मार्केटचा बाजारच उठला, आता करावं तरी काय?

10. Personal Finance: ATM वापरलं की, तुमचे पैसे कापले जाणार, 1 मे पासून येणार नियम पाहून ठेवा बरं!

11. Personal Finance: 50,000 रुपये पगार असलेली लोकंही बनू शकतात करोडपती, फक्त 300...

12. Personal Finance: EPFO कडून मोठा दिलासा, PF मधून काढता येणार 5 लाख... तेही थेट UPI आणि ATM वापरून!

13. Personal Finance: 500 रुपयांच्या मासिक SIP ने किती दिवसांत होऊ शकता कोट्यधीश? संपूर्ण गणित घ्या समजून

14. SIP सारखी जबरदस्त कमाई आणि FD सारखे दर महिन्याला पैसे, SWP प्लॅन नेमका काय?

 

    follow whatsapp