Mumbai Local Viral Video : वळला अन् 'लोकल'मधून पडला; 'त्या' प्रवाशाचं काय झालं? 

मुंबई तक

• 04:17 PM • 27 Jul 2024

Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकलमधून एक तरुण पडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इतक्या भीषण अपघातातूनही तो वाचला आहे. ती घटना नेमकी कधी घडलेली?

मुंबई लोकलमधून पडणाऱ्या प्रवाशाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मुंबई लोकलमधून प्रवासी पडला, ते दृश्ये.

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई लोकलमधून प्रवास करताना पडला प्रवाशी

point

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ कधीचा?

point

मध्य रेल्वेने त्या व्हिडीओबद्दल काय सांगितलं?

Mumbai Local Accident : भरधाव लोकल ट्रेनला लटकून प्रवास करत असताना एक व्यक्ती बाजूची ट्रेन बघण्यासाठी वळतो आणि खाली पडतो. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पडल्यानंतर त्या तरुणाचा मृत्यू झाला, असेही सांगितले जात आहे. या घटनेबद्दल आता मध्य रेल्वे विभागानेच माहिती दिली आहे. या भीषण अपघातातूनही हा तरुण वाचला आहे. (young man fall from mumbai local train, shocking video Goes Viral)

हे वाचलं का?

मुंबई लोकलमधून मृत्यू होण्याच्या घटना दररोज घडत असतात. रेल्वेकडून सातत्याने लटकून प्रवास टाळा असेही सांगितले जाते, पण प्रचंड गर्दीमुळे लोक जागा मिळेल तिथे पाय ठेवून आणि लटकून प्रवास करतात. त्यामुळे दररोज कुणाला ना कुणाला जीव गमवावा लागतो. 

भरधाव ट्रेनमधून पडला पण वाचला...

मुंबई लोकलमधून एक प्रवासी खाली पडतानाच व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये एक्स्प्रेसमधील व्यक्ती बाजूने जाणाऱ्या लोकलचा व्हिडीओ शूट करत आहे.

हेही वाचा >> लोकल पकडायला गेली अन् दोन्ही पाय..., नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना 

याचवेळी लटकलेला एक व्यक्ती थोडासा वळतो. त्याचवेळी विजेच्या खांबावर आदळून क्षणार्धात तो खाली पडतो. तो इतका जोरात पडतो की, तो वाचला असेल, असे कुणीही म्हणत नाही. 

मुंबई लोकल अपघाताचा व्हिडीओ पहा

मुंबई लोकलमधील 'ती' घटना कधीची?

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने या घटनेबद्दल माहिती दिली आहे. मुंबई रेल प्रवासी संघाने केलेला व्हिडीओ ट्विट केला आहे. त्याला उत्तर देताना मध्य रेल्वेने म्हटले आहे की, जी व्यक्ती पडली आहे, तो जखमी झाला आहे. पण, तो वाचला आहे. हा व्हिडीओ जुना म्हणजे जून 2022 मधील आहे. आपल्या विनंती आहे की, जुने व्हिडीओ पसरवून भीती निर्माण करू नका. आम्ही सातत्याने नवीन लाईन आणि उपनगरीय सेवा वाढवत आहोत, असे रेल्वेने म्हटले आहे. 

हेही वाचा >> पिता-पुत्राने ट्रेनसमोर उडी मारली अन्.. हादरवून टाकणारा VIDEO

जुन्या घटनेचा हा व्हिडीओ मुंबईमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर आणि लोकल सेवा वारंवार विस्कळीत झाल्यानंतर व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडीओ जुना असून, अपघातातील व्यक्ती बचावला होता. 

    follow whatsapp