'या' तारखेपासून मुंबईचा Elphinstone Bridge दोन वर्षांसाठी राहणार बंद! वाहतुकीचे पर्यायी मार्ग कोणते?

Elphinstone Bridge Close From 16th April : मुंबई शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन पुलाची पुर्नबांधणी केली जाणार आहे.

Elphinstone Bridge Closes From 16th April

Elphinstone Bridge Closes From 16th April

मुंबई तक

09 Apr 2025 (अपडेटेड: 09 Apr 2025, 07:54 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

16 एप्रिलपासून एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद!

point

'हे' आहेत वाहतुकीचे पर्यायी मार्ग

point

दोन वर्षांसाठी एल्फिन्स्टन पूल राहणार बंद

Elphinstone Bridge Close From 16th April : मुंबई शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन पुलाची पुर्नबांधणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे वाहतुकीसाठी हा पूल दोन वर्षे बंद असणार आहे. डबल डेकर ब्रिज बांधण्यासाठी एमएमआरडीएकडून जुन्या पुलाचं बांधकाम तोडण्यात येणार आहे. एल्फिस्टन ब्रिज 16 एप्रिलपासून बंद केला जाणार आहे. करी रोडjला सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत लोअर परळकडे एकेरी वाहतूक असेल आणि दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत भारतमाताकडे एकेरी वाहतूक असणार आहे. 

हे वाचलं का?

परंतु, एल्फिस्टन पूल बंद करण्याआधी मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी काही हरकती मागवल्या आहेत. तसच हा पूल दोन वर्षांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहतुकीतही बदल केले जाणार आहेत. मुंबईतील प्रवाशांना वाहतूक कोंडीच्या समस्येला नेहमीच सामोरं जावं लागतं. 

हे ही वाचा >> पुण्यात भूतानच्या तरूणीवर बलात्कार.. अजितदादांच्या पक्षाचा माजी पदाधिकारी मुख्य आरोपी, घटना काय?

'हे' आहेत वाहतुकीचे पर्यायी मार्ग

अशातच एल्फिस्टन पुलाचं बांधकाम तोडण्याआधी 13 एप्रिलपर्यंत हरकती मागवल्या आहेत. परंतु, दिलेल्या तारखेपर्यंत हरकतींची नोंद न झाल्यास 16 एप्रिलपर्यंत वाहतूक बंद केली जाईल आणि त्यानंतर पुलाचं बांधकाम तोडण्यात येईल, अशी माहिती आहे.  
भारतमाता जंक्शनपासून लोअर परळला जाण्यासाठी एक दिशा वाहतूक (One Way Traffic) खुली असणार आहे.

सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा मार्ग एक दिशा वाहतुकीसाठी खुला असणार आहे. तसच दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत लोअर परळपासून भारतमाता जंक्शनपर्यंत एक दिशा वाहतूक खुली राहणार आहे. तर रात्री 11 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले असणार आहेत. 

हे ही वाचा >> करूणा मुंडे आहेत तरी कोण? आतापर्यंत धनंजय मुंडेंना कसं आणलं अडचणीत.. पाहा A टू Z माहिती

महादेव पालव रोड 

सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भारत माता जंक्शनपासून शिंगटे मास्टर चौकपर्यंत एक दिशा वाहतूक खुली राहणार आहे. तर दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत शिंगटे मास्टर चौक ते भारत माता जंक्शन एक दिशा वाहतूक खुली ठेवण्यात येणार आहे. रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत दोन्ही दिशा वाहतुकीसाठी खुल्या राहणार असल्याची माहिती आहे. 

    follow whatsapp