Mumbai Weather Update: मुंबईत तुफान बरसतोय पाऊस, 24 तासात अति मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई तक

19 Jul 2024 (अपडेटेड: 19 Jul 2024, 11:36 AM)

Maharashtra Weather Update: मुंबई आणि उपनगरात पुढील 24 तासात अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. पाहा मुंबईसह महाराष्ट्रात नेमकं हवामान कसं आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत आज हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट

point

कोकणातील अनेक भागात मुसळधार पाऊस

point

महाराष्ट्रातील हवामानाची नेमकी स्थिती जाणून घ्या

Maharashtra Weather Update: मुंबई: मुंबई आणि उपनगरातील बहुतेक भागात मागील 24 तासात मुसळधार ते अति मुसळधार 
पावसाची नोंद झाली आहे. तर पुढील 24 तासात देखील अशाच स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज (19 जुलै) सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. हवामान खात्याने काल मुंबई आणि परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मात्र, पावसाचा जोर मुंबईत वाढू शकतो. (accurate forecast of rain in mumbai and maharashtra weather news meteorological department weather forecast for next 24 hours 19th july 2024 thunderstorm rains in mumbai very heavy rain forecast in 24 hours)
 
दुसरीकडे कोकण किनारपट्टी भागातही काल रात्रीपासूनच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. त्यामुळे हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये नेमकं हवामान नेमकं कसं असेल हे आपण जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Aanvi Kamdar Death: Video शूट करता-करताच गेला मुंबईच्या तरुणीचा जीव, तिथे गेली अन्...

महाराष्ट्र हवामान अपडेट (Maharashtra Weather Alert) 

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हवामानाचे अंदाज आणि मुंबईतील पावसाचा नेमका अंदाज

मुंबई आणि उपनगरात अतिमुसळधार पावसाची शक्यता 

मुंबईत गेल्या २४ तासांत बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तर पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज असा की, शहर आणि उपनगरात मसुळधार ते अति मसुळधार पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 28°C आणि 24°C च्या आसपास असेल.

कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता, रत्नागिरीला रेड अलर्ट

कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भाग व काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्याला याचा फटका बसला आहे. कणकवलीतील आचरा-मालवण रस्त्यावर पाणी आल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

हे ही वाचा>> Jalna Accident : 'त्याला' वाचवायला गेला अन् सात जणांनी जीव गमावला, जालन्यात काय घडलं?

तर कुडाळ येथील भंगसाळ नदीच्या पुराचे पाणी कुडाळ शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गुलमोहर हॉटेल येथे आल्याने वाहतूक RSN हॉटेल मार्गे वळविण्यात आली आहे. 

सावंतवाडी वेंगुर्ला मार्गावर होडावडा पुलावर पाणी आल्यामुळे येथील वाहतूक वजराठ मठ मार्गे वळविण्यात आली आहे. तर कणकवली आचरा मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पर्यायी बिडवाडी मार्गे वळविण्यात आली आहे.

सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली असून काही भागात पावसाची रीपरीप सुरू आहे.

मध्य महाराष्ट्रातही चांगल्या पाऊस बरसणार

मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातही पाऊस चांगला बरसणार 

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp