Gold Price: ऐन सणासुदीत सोन्याने गाठला उच्चांक! 1 तोळ्याचा भाव बघूनच होईल नादखुळा  

रोहिणी ठोंबरे

17 Oct 2024 (अपडेटेड: 17 Oct 2024, 11:27 AM)

Gold Rate Today 16 Oct 2024 : सणासुदीच्या दिवसात सोन्याला प्रचंड झळाळी आली आहे. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना आता सोने खरेदी करताना ग्राहकांचं दिवाळंच निघणार आहे. कारण यावेळी सोन्याने नवा उच्चांक गाठला.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

Gold Rate Today 16 Oct 2024 : सणासुदीच्या दिवसात सोन्याला प्रचंड झळाळी आली आहे. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना आता सोने खरेदी करताना ग्राहकांचं दिवाळंच निघणार आहे. कारण यावेळी सोन्याने नवा उच्चांक गाठला. अशावेळी दिवाळीपूर्वी सोने खरेदी करण्याचा किंवा बुकिंग करण्याचा विचार करत असाल तर, आजच्या (16 ऑक्टोबर 2024) सोने-चांदीच्या किंमतीत झालेले मोठे बदल जाणून घेऊयात. (Gold-Silver prices hike before diwali festival what are the rates of 24 22 and 18 carat gold today 17 october 2024 in maharashtra mumbai pune)

हे वाचलं का?

भारतात सोने-चांदीच्या किंमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. पण आज थोडं का होईना यामध्ये बदल झाला आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी (16 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 77,890 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 220 रूपयांनी वाढ झाली असून याची किंमत 78,110 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,400 रूपये होता. त्यातही 200 रूपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 71,600 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 96,800 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

हेही वाचा : Maharashtra Weather: राज्यातील 'या' भागांना तीव्र ते मुसळधार पावसाचे अलर्ट! मुंबईत IMD चा अंदाज काय?

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. 

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,600 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,110 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,580 रूपये आहे.

पुणे

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,600 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,110 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,580 रूपये आहे.

नागपूर

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,600 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,110 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,580 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,630 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,140 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,610 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हेही वाचा : Horoscope In Marathi: दिवाळीआधीच 'या' राशीच्या लोकांचे वाढणार उत्पन्नाचे स्त्रोत! उद्योगधंद्यातून...

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

    follow whatsapp