Pawar Family: अजितदादांच्या बंडानंतर पक्ष, पवार कुटुंबात फूट पण ‘इथे’ मात्र सगळे एकत्र!

मुंबई तक

• 01:22 PM • 11 Jul 2023

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात फूट पडल्याचं सकृतदर्शनी दिसतं आहे. पण असं असलं तरीही अनेक संस्थांचा कारभार हेच पवार कुटुंब एकत्रितपणे सांभाळणार असल्याचं पाहायला मिळतंय.

Ajit Pawar's rebellion, it is evident that there is a split between the NCP and the Pawar family. But even so, it can be seen that the Pawar family will jointly manage the affairs of many institutions

Ajit Pawar's rebellion, it is evident that there is a split between the NCP and the Pawar family. But even so, it can be seen that the Pawar family will jointly manage the affairs of many institutions

follow google news

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP)सध्या मोठी फूट पडली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात अनेक दिग्गज नेत्यांनी बंड करत शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडली. पण याच बंडासोबत पवार कुटुंबीयांमध्ये पहिल्यांदाच फूट पडल्याचं समोर आलं आहे. आजवर अनेक राजकीय संकटं आली तरी पवार कुटुंबीय हे कायम अभेद्य असायचं. काहीही झालं तर पवार कुटुंबातील मतभेद हे कायम चार भिंतींच्या आतच राहिले. पण आता पहिल्यांदाच त्याच्या कुटुंबातील वाद हे चव्हाट्यावर आले आहेत. स्वत: अजित पवारांनी शरद पवारांना त्यांचं वय झालं असून तुम्ही निवृत्त व्हा असा जाहीर सल्ला देऊन टाकला. तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) ‘आपल्या बापाचा नाद करायचा नाय..’, असा इशारा देत राजकीय लढाईसाठी कंबरही कसली. (ajit pawar rebellion split ncp and pawar family will jointly manage affairs many institutions vidya pratishthan yashwantrao chavan center sharad pawar supriya sule)

हे वाचलं का?

दरम्यान, राजकीय पातळीवर अनेक गोष्टी सुरू असताना आता काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. जे सहकार, बँकिंग क्षेत्रातील पवारांच्या वर्चस्वाबाबत आहेत. या क्षेत्रांमध्ये विशेषत: बारामतीत अनेक संस्थांवर शरद, पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे हे कार्यरत आहेत. पण आता राजकीय आणि कौंटुबिक पातळीवर जी फूट पडली आहे. त्यानंतर या संस्थांचा कारभार दोन्ही पवार कसा हाकणार असा प्रश्न बारामतीसह अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे.

सगळ्यात आधी जाणून घेऊयात कोणकोणत्या संस्थांवर पवार कुटुंबीय एकत्रितपणे कार्यरत आहेत:

1. विद्या प्रतिष्ठान: विद्या प्रतिष्ठानची निर्मिती झाली साधारण 1992 ते 1998 च्या काळात. या काळात मराठी माध्यमिक शाळा, इंग्रजी माध्यमाची शाळा, कॉलेज, लॉ कॉलेज, बी. एड. कॉलेज यांची टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली. विद्या प्रतिष्ठानचा संपूर्ण परिसर हा तब्बल 27 एकरमध्ये पसरलेला आहे. पुणे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी हे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये शिक्षण घेण्यासाठी प्राधान्य देत असल्याचं चित्र गेली अनेक वर्ष पाहायला मिळालं आहे.

आता याच विद्या प्रतिष्ठानचा नेमका कारभार कोण-कोण सांभाळतो हे आपण पाहूयात.

विद्या प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष हे शरद पवार आहेत. तर याच संस्थेचे विश्वस्त अजित पवार हे आहेत. तर याशिवाय शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या संस्थेच्या सदस्या आहेत. तसेच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील या संस्थेच्या सदस्या आहेत. तर अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठानेच कोषाध्यक्ष आहेत.

हे ही वाचा >> 602 मध्ये ऑफिस नको रे बाबा!; अजित पवारच अंधश्रेद्धेचे ‘बळी’, प्रकरण काय?

2. यशवंतराव चव्हाण सेंटर: यशवंतराव चव्हाण सेंटर ही कल्पना खरं तर शरद पवार यांच्या कल्पनेतून आकारास आली. यशवंतराव चव्हाणांच्या निधनानंतर 25 नोव्हेंबर, 1984 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरची मुहूर्तमेढ रोवली गेली. आणि 17 सप्टेंबर, 1985 रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची (Y.B. Center) याची स्थापना करण्यात आली. मुंबईत या प्रतिष्ठानचे मुख्यालय हे मुंबईत असून राज्यातील तब्बल 27 जिल्ह्यांमध्ये याची केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, महिला, युवा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या धोरणांसंबधी आणि बाबीवर काम केलं जातं.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कारभार नेमकं कोण सांभाळतं?

यशवंतराव चव्हाण सेंटरचं अध्यक्षपद हे शरद पवार यांच्याकडे आहे. तर त्याच्या उपाध्यक्ष पदी अरुण गुजराथी हे आहेत. तर कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे या आहेत. तर याच्या विश्वस्त मंडळात सध्या अजित पवार गटात गेलेले दिलीप वळसे-पाटील यांचाही समावेश आहे. तर कार्यकारिणी मंडळात जयंत पाटील आणि राजेश टोपे यांचाही समावेश आहे.

3. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) पूर्वी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट म्हणून ओळखली जात होती. ही एक स्वायत्त संस्था आहे. 1975 मध्ये ऊस उत्पादक सभासदांनी याची स्थापना केली. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने ही जगातील अशा प्रकारची एकमेव संस्था आहे. संस्था साखर उद्योगाशी संबंधित सर्व वैज्ञानिक तांत्रिक आणि शैक्षणिक कार्ये एकाच छत्राखाली पार पाडते.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने व्हीएसआयला संशोधन केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. पीएच.डी.पर्यंतच्या अभ्यासासाठी हे संशोधन केंद्र म्हणूनही ओळखले जाते.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा कारभार कोणाच्या हाती?

शरद पवार हे अध्यक्ष पदी आहेत. तर दिलीप वळसे-पाटील हे या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. याशिवाय अजित पवार आणि जयंत पाटील हे या संस्थेत सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

हे ही वाचा >> ’70 कोटींचं काय झालं’, उद्धव ठाकरे तापले! ‘कलंक’वरून मोदींवरही चढवला हल्ला

या तीन महत्त्वाच्या संस्थांमध्ये पवार कुटुंबातील अनेक जण हे आजही कार्यरत आहेत. याशिवायही राज्यातील अनेक अशा संस्था आहेत की, ज्याच्या कार्यकारिणीत पवार कुटुंबातील अनेक व्यक्ती आहेत. पण आता पक्षात आणि कुटुंबात फूट पडलेली असतानाही पवार कुटुंबातील या संस्थाचा एकत्रितपणे नेमका कारभार कसा सांभाळणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp