कोणत्या तेलाच्या सेवनामुळे Heart Attack चा धोका वाढतो? कोणतं OIL आहे सर्वात बेस्ट? जाणून घ्या

Best Cooking Oil : आताच्या धावपळीच्या जगात हार्ट अटॅकचे धोके वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कमी वयाच्या लोकांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे.

Best Cooking Oil For Health

Best Cooking Oil For Health

मुंबई तक

• 08:03 PM • 08 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक 

point

शरीरासाठी तेलाचं सेवन खूप आवश्यक

point

मेडिटेरियन डाएटमुळे हार्ट अटॅकचा धोका होतो कमी

Best Cooking Oil : आताच्या धावपळीच्या जगात हार्ट अटॅकचे धोके वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कमी वयाच्या लोकांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅकची समस्या जाणवते, असं म्हणतात. याबाबत प्रसिद्ध कार्डियोथोरेसिक डॉ. नरेश त्रेहान यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महत्त्वाची माहिती दिलीय. त्रेहान यांनी कोलेस्ट्रोल, आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या तेलाबाबतही माहिती सांगितली आहे. 

हे वाचलं का?

कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक 

डॉ. त्रेहान यांनी म्हटलंय, कोलेस्ट्रॉल शरीराचा महत्त्वाचा घटक असतो. आपलं शरीर स्वत: कोलेस्ट्रोल निर्माण करते. कोलेस्ट्रोल वाईट नसतं. जास्त प्रमाणात असलेलं कोलेस्ट्रोल धोकादायक असतं. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त नसेल, तर काही समस्या नाहीय. तुमचं शरीर स्वत: कोलेस्ट्रॉल निर्माण करतं आणि ते कंज्यूम करतं. कोलेस्ट्रोलला मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही डाएटमध्ये बदल करू शकता. म्हणजेच यलो बटर ऐवजी तुम्ही व्हाईट बटर वापरू शकता. हे आरोग्यासाठी खूप चांगलं ठरतं. कारण ते प्रोसेस्ड नसतं, असं डॉ. त्रेहान यांनी म्हटलंय.

हे ही वाचा >> भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रताप! 'लव्ह जिहाद'चा आरोप करत पोलीस स्टेशनमध्येच तरूणांना मारलं, घटना काय?

शरीरासाठी तेलाचं सेवन खूप आवश्यक

डॉ. त्रेहान यांच्या माहितीनुसार, शरीरासाठी तेल खूप गरजेचं आहे. परंतु, हायड्रोजेनेटेड ऑईल ज्याला वनस्पती घी असं म्हणतात. ते शरीरासाठी खूप हानिकारक असतं. कारण ते आर्टरी क्लॉगिंगचं कारणं बनतं. आर्टरी क्लॉगिंग म्हणजे धमण्यांमध्ये प्लेक (Plaque) जमा होणं. यामुळे ब्लड फ्लो कमी होतं. ही एक गंभीर समस्या आहे, ज्यामुळे हृदय स्ट्रोकचा धोका वाढतो. लिक्विड फॅट सॉलिड फॅटपेक्षा चांगलं असतं. कारण लिक्विडमध्ये मोनोसॅच्यूरेटेड फॅट असतं आणि सॉलिडमध्ये पॉलिसॅच्युरेटेड फॅट असतं. 

मेडिटेरियन डाएटमुळे हार्ट अटॅकचा धोका होतो कमी

डॉ. नरेश त्रेहान सांगतात की, लोक मेडिटेरेनियन डाएट फॉलो करतात. त्यांना हार्ट अटॅकचा सर्वात कमी धोका असतो. मेडिटेरेनियन पदार्थांत ऑलिव्ह ऑईल वापरलेलं असतं. म्हणून असं म्हटलं जातं की, ऑलिव्ह ऑईल हेल्थसाठी सर्वात बेस्ट ऑईल आहे. 

हे ही वाचा >> 8th April 2025 Gold Rate : बाईईई...काय हा प्रकार! दोन दिवसांपूर्वी स्वस्त झालेलं सोनं पुन्हा महागलं, आजचे दर काय?

प्रत्येक सहा महिन्यात बदला खाण्याचं ऑईल

डॉ. त्रेहान यांच्या माहितीनुसार, ऑलिव्ह ऑईल खूप महाग असतं. त्यामुळे सर्वांनाच ते परवडणारं नसेल. लोकांनी दर सहा महिन्यात ऑईल बदललं पाहिजे. तुम्ही सनफ्लॉवर ऑईल वापरू शकता. राईस ऑईल किंवा मस्टर्ड ऑईलचाही वापर करू शकता. त्यांनी सांगितलं की, प्रत्येक ऑईलमध्ये काही ना काही कमी असते. त्यामध्ये हानिकारक द्रव्यही असू शकतात. 

    follow whatsapp