Beed : बबन गित्तेंनी डोक्यात घातली गोळी, परळीत राष्ट्रवादीच्या सरपंचाची हत्या कशी झाली?

मुंबई तक

30 Jun 2024 (अपडेटेड: 30 Jun 2024, 04:22 PM)

Beed News : परळीत झालेल्या हत्याकांडाने बीड जिल्हा हादरला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच बापू आंधळे यांची भरवस्तीत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. 

बापू आंधळे हत्या प्रकरणी बबन गित्ते यांच्यावर गुन्हा दाखल.

परळी शहरात अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांची हत्या.

follow google news

बातम्या हायलाइट

point

सरपंच बापू आंधळेंची हत्या कशी झाली?

point

परळीमध्ये अजित पवार गटाच्या सरपंचाची हत्या

point

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा

Beed Crime News : (रोहिदास हातागळे, बीड) परळीत शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. मरळवाडीचे सरपंच असलेल्या बापू आंधळे यांना गोळ्या घालून जीवे मारण्यात आले. या प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे हे प्रकरण काय आणि हत्येचे कारण काय? हेच समजून घ्या... (why NCP's Ajit Pawar Faction Sarpanch bapu Andhale shot dead by accused)

हे वाचलं का?

फिर्यादीत दिलेल्या माहितीप्रमाणे, 29 जून रोजी रात्री 8.30 वाजता ही घटना घडली. आरोपींनी कट रचून मयत बापू आंधळे आणि ग्यानबा गित्ते यांना आरोपी महादेव गित्ते यांच्या परळीतील बँक कॉलनीतील घरी बोलावले. 

तिथे बबन गित्ते मयत बापू आंधळे यांना म्हणाले की, 'आय#@ तू पैसे आणलेस का?' त्यावर बापू आंधळे म्हणाले की, 'आईवरून शिव्या देऊ नका.'

बबन गित्तेंनी पिस्तूल काढले अन् डोक्यात मारली गोळी

बापू आंधळेंनी शिवीगाळ करू नका असे म्हणताच बबन गित्तेंनी कमरेला असलेले पिस्तूल काढले आणि बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली. तितक्यात राजाभाऊ नेहरकरने आंधळेंच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यातच आंधळे यांचा जागेवरच मृत्यू झाला.

हेही वाचा >> T20 World Cup ट्रॉफीसोबत 'टीम इंडिया'ला मिळाले 'इतके' कोटी; इतर संघांना किती कोटी? 

त्यानंतर महादेव गित्तेने ग्यानबा गित्ते यांच्यावर गोळी झाडली. ती गोळी ग्यानबा गित्ते यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली. त्यानंतर मुकुंद गित्ते आणि राजेश वाघमोडे यांनी ग्यानबा गित्ते यांना मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या कलमांसह इतर भारतीय दंड विधान कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते पाच आरोपी कोण?

1) शशिकांत पांडुरंग गित्ते ऊर्फ बबन गित्ते, रा. बँक कॉलनी परळी.
2) मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते, रा. वाघबेट ता. परळी
3) महादेव उद्धव गित्ते, रा. बँक कॉलनी परळी
4) राजाभाऊ संजीवन नेहरकर, रा. पांगरी, ता. परळी
5) राजेश अशोक वाघमोडे, रा. पिंपळगाव गाडे, ता. परळी

बीडचे पोलीस अधीक्षक काय म्हणाले?

परळीत झालेल्या हत्येबद्दल बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "या गुन्ह्यात पाच आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी फरार आहेत. एका जणाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत."

परळीतील बँक कॉलनीत याच ठिकाणी बापू आंधळे यांचा मृतदेह पडलेला होता.

हेही वाचा >> "जे लोक मला एक टक्काही...", रडतच हार्दिकने सांगितल्या वेदना

"भादंवि कलम 302,307 आणि भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. सदरील घटना पैशाच्या वादातून झाली आहे आणि याचा तपास केला जात आहे",  असे पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी सांगितले. 

बापू आंधळेंनी बदलला होता पक्ष

मयत सरपंच बापू आंधळे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी बबन गित्ते यांच्या पॅनलमधून ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती. ते सरपंच निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर बापू आंधळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

हेही वाचा >> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा? 

दरम्यान, सरपंच बापू आंधळे यांचे आणि बबन गित्ते यांचे जुने भांडण होते. पैशाच्या देवाणघेवाणीवरून या दोघांत अनेकदा वाद झाले होते. लोकसभा निवडणुकीनंतर या दोघांमधील वाद अधिकच टोकाला गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत आंधळे हे धनंजय मुंडे यांच्या गटात असल्याने गित्ते यांनी त्यांना अनेकदा जाब विचारला होता, अशी माहिती आहे.

    follow whatsapp