Man Dies In Garba Dance Shocking Video Viral, Pune : मागील आठवड्यापासून नवरात्री उत्सवाची धामधूम सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी नवरात्रीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. अशातच लोक गरबा खेळण्याचा आनंदही व्यक्त करत आहेत. नवरात्री म्हटलं की, अनेकांना वेध लागतात ते गरबा खेळण्याचे. परंतु, पुण्याच्या चाकण परिसरात गरबा खेळणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. पुण्यातील चाकण परिसरात गरबा खेळताना एका व्यक्तीला अचानकपणे भोवळ आली आणि काही वेळानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अशोक माळी असं मृत पावलेल्या डान्सरचं नाव आहे.
ADVERTISEMENT
पुण्याच्या चाकण परिसरात गरबा खेळताना एकाचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, गरबा खेळताना एका व्यक्तीला अचानकपणे भोवळ आली आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. अशोक माळी असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे या अशोकचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुण्याच्या चाकण परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे.
हे ही वाचा >> ladki Bahin Yojana : महिलांनो! 'या' दिवशी खात्यात जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे; CM शिंदेंनी दिली अपडेट
या घटनेत अशोक माळी या गरबा डान्सरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशोक माळी हा चाकण परिसरामध्ये लहान मुलां सोबत गरबा डान्स करत असताना त्याला अचानक भोवळ आली आणि तो खाली कोसळला. त्यांनतर काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. नवरात्रीत गरबा खेळण्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक लोक उत्सवाच्या ठिकाणी गर्दी करतात.
इथे पाहा व्हिडीओ
विविध रंगांचे कपडे परिधान करून नवरात्रीत दांडिया खेळण्याची लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. परंतु, काही लोक गरबा खेळण्याच्या नादात आपला जीव धोक्यात टाकतात. आरोग्याची काळजी न घेता डान्स करण्याचा मोह काहींच्या जीवावर बेततो. अशाच प्रकारची घटना पुण्यात घडली. अशोक माळी नावाच्या एका तरुणाला गरबा खेळत असताना अचानक भोवळ आली आणि त्याचा मृत्यू झाला. गरबा खेळताना अशोकला हृदय विकाराचा झटका आला, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
हे ही वाचा >> Horoscope In Marathi : नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पैशांचा पडणार पाऊस? 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंती
ADVERTISEMENT