Diwali 2024 Muhurat : दिवाळी म्हटलं की, रोषणाई, फटाक्यांचा आवाज, फराळ आणि नुसता जल्लोष डोळ्यासमोर येतो. यंदा 31 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजे उद्या दिवाळी साजरी केली जाईल. दिवाळीत लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केल्याने घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येते असे म्हटले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान श्री राम 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले आणि गावकऱ्यांनी दिवे लावले. तेव्हापासून दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, दिवाळी हा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला साजरा केला जातो.
ADVERTISEMENT
यंदा दिवाळीचा शुभ मुहूर्त कधी?
यावेळी कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या दुपारी 3:52 वाजता सुरू होईल आणि तिथी 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:16 वाजता समाप्त होईल.
हेही वाचा : Congress Song : यंदा पंजा, यंदा पंजा... काँग्रेसचं प्रचारगीत, नाना पटोले मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? का होतेय चर्चा?
दिवाळी लक्ष्मी पूजनाची वेळ
प्रदोषकाळात दिवाळीची पूजा केली जाते, म्हणून या दिवशी प्रदोष काळ 31 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.36 ते रात्री 8.11 पर्यंत असेल. त्याच वेळी, वृषभ राशीची वेळ संध्याकाळी 6:25 ते 8:15 पर्यंत असेल. त्याचबरोबर 31 ऑक्टोबर रोजी रात्री 11:39 ते 12:30 पर्यंत महानिशीथ काळात पूजेचा दुसरा मुहूर्त आहे.
दिवाळी शुभ योग (Diwali 2024 Shubh Yog)
या वेळी दिवाळी खूप खास मानली जात आहे कारण या दिवशी 40 वर्षांपासून शुक्र आणि गुरूच्या संयोगामुळे समसप्तक योग तयार होत आहे. तसेच, शनी स्वतःच्या कुंभ राशीत बसून शश राजयोग निर्माण करत आहे.
हेही वाचा : Gold Price Today in Choti Diwali : सोन्याने नादच केलाय थेट! दिवाळीत रेकॉर्ड ब्रेक भाव, 1 तोळ्याचा दर किती?
दिवाळी पूजा विधी
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी पूजेसाठी पाट तयार करा आणि नंतर लक्ष्मी आणि भगवान श्रीगणेशाच्या मूर्ती त्या पाटावर ठेवा. मूर्ती तयार केल्यानंतर त्यांच्यासमोर दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करा. त्यानंतर मूर्तीसमोर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. त्यानंतर लक्ष्मी आणि श्री गणेशाला फळे, फुले, मिठाई इत्यादी अर्पण करा. त्यानंतर माता लक्ष्मी आणि गणपतीची आरती करा.
दिवाळीच्या रात्री लक्ष्मीला गुलाबाचे फूल आणि काही नाणी अर्पण करा. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व नाणी एखाद्या गरीबाला दान करा.
ADVERTISEMENT