Maharashtra Weather: विजांचा कडकडाट, वादळी वारा! ऐन दिवाळीत पावसाचा धुमधडाका?

मुंबई तक

30 Oct 2024 (अपडेटेड: 30 Oct 2024, 10:40 AM)

Maharashtra IMD Rain Alert 30 October 2024  : देशभरात दिवाळीच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. पण यासर्वात राज्याच्या अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Mumbaitak
follow google news

Maharashtra IMD Rain Alert  : देशभरात दिवाळीच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. पण यासर्वात राज्याच्या अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून पुढील तीन दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. ओडिशातील दाना चक्रीवादळामुळे राज्यात काही भागात पाऊस बरसेल. (maharashtra weather forecast update Today 30 october rain alert in diwali to these districts IMD report mumbai pune)

हे वाचलं का?

'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट!

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार (IMD), आज राज्यातील जवळपास 12 जिल्ह्यांवर पावसाचे सावट आहे. एकीकडे मुंबई सारख्या भागात उकाडा जाणवत असताना या जिल्ह्यांवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. 

हेही वाचा : C-Voter: शिंदे-भाजप सरकार जाणार? खळबळजनक सर्व्हे आला समोर

Weather in Chandrapur, Nagpur, Vardha: हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 30 ते 31 ऑक्टोबरदरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यात आज 29 रोजी छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, गडचिरोली, गोंदिया, अहिल्यानगर, पुणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, जालना, भंडारा या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची एन्ट्री होऊ शकते.

त्याचवेळी, 30-31 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा : 'आर. आर. पाटलांनी माझा केसाने गळा कापला', अजित पवारांच्या विधानाने मोठी खळबळ

Weather of Maharashtra Today:आज आणि उद्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 31 ऑक्टोबरला राज्यातील विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.


 

    follow whatsapp