Gold Prices in Mumbai Today 8 Nov 2024 : दिवसेंदिवस सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ सुरू असल्याचं पाहयला मिळत आहे. चांदीचे दर देखील गगनाला भिडले आहेत. दिवाळी संपताच सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती. मात्र आज (8 नोव्हेंबर 2024) सोन्याची झळाळी पुन्हा एकदा वाढली आहे. लग्नसराईच्या मोसमात सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांचं टेन्शन आता वाढलं आहे. चला तर आजच्या सोने-चांदीच्या किंमतीतील हे बदल सविस्तर जाणून घेऊयात. (Gold-Silver prices hike today 8 november 2024 what are the rates of 24 22 and 18 carat gold mumbai pune nashik)
ADVERTISEMENT
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather: राज्यातील 'या' भागात हुडहुडी वाढली! वाचा IMD रिपोर्ट
देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 carat सोन्याचा भाव 80,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, गुरूवारी (8 ऑक्टोबर 2024) 24 carat 10 gm(1 तोळा) सोन्याचा भाव 78,560 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 910 रूपयांनी वाढ झाली असून याची किंमत 79,470 रूपये झाली आहे. तर, 22 carat सोन्याचा भाव 72,000 रूपये होता. त्यातही 850 रूपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 72,850 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 94,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
हेही वाचा : Nana Patole : बदलापूरच्या 'त्या' शाळेत ब्ल्यू फिल्म बनवायचे, शरीराचे अवयव विकायचे, नाना पटोले यांचे खळबळजनक आरोप
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
10gm 22, 24, 18 carat in Mumbai
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,850 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,470 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,610 रूपये आहे.
Gold Rate 22, 24, 18 carat in Pune
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,850 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,470 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,610 रूपये आहे.
Gold Price 22, 24, 18 carat in Nagpur
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,850 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,470 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,610 रूपये आहे.
10gm 22, 24, 18 carat in Nasik
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,880 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,500 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 59,640 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
22 carat सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 carat सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT