वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरात जोरदार चर्चा होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या खास शैलीबद्दल इंटरनेटवर चर्चा आहे. डोनाल्ड ट्रम्प अनेकदा आपल्या भावना व्यक्त करताना अजिबात मागचा पुढचा विचार करत नाहीत आणि त्यांच्या विनोदी विधानांमुळे ते चर्चेतही राहतात. अनेकवेळा त्यांनी त्यांची मुलगी इवांका ट्रम्पबद्दल देखीलं अशी काही विधानं केली आहेत की, ज्यामुळे ते चर्चेत आले आहेत. आता निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा त्यांची एक मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी मुलगी इवांकाबद्दल एक बोल्ड विधान केलेलं
ADVERTISEMENT
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ही घटना 1997 मध्ये घडली होती, जेव्हा इवांका ट्रम्प 16 वर्षांची होती आणि मिस टीन यूएसए स्पर्धेचे आयोजन करत होती. त्यावेळी या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांनी उपस्थित मिस युनिव्हर्सला विचारले होते की, 'माझी मुलगी हॉट आहे असे तुम्हाला वाटत नाही का? ती हॉट आहे, नाही का?'
हे ही वाचा>> Oshin Sharma: 'ती' गोष्ट घडली अन् उपजिल्हाधिकारी मॅडमचा करेक्ट कार्यक्रम...
गेल्या निवडणुकीत इवांका तिचे वडील डोनाल्ड ट्रम्प यांची सल्लागार होती आणि निवडणूक प्रचारात त्यांच्यासोबत होती. त्यावेळी इवांका म्हणाली होती की, 'माझे वडील आपल्या सर्वांसाठी दररोज कठोर संघर्ष करतात.'
त्याचप्रमाणे, हॉवर्ड स्टर्न शोवर एका मुलाखतीदरम्यान, ट्रम्प यांनी आपली मुलगी इवांकासाठी Voluptuous हा शब्द वापरला, ज्याचा अर्थ आकर्षक, कामुक इत्यादी आहे आणि तिचे वर्णन एक अद्भुत मुलगी म्हणून केलेले. यानंतर, त्यांनी पुन्हा इवांकाचे कौतुक केले आणि सांगितले की इवांका जगातील महान सुंदरींपैकी एक आहे.
हे ही वाचा>> Viral Video: जे मोंडी अन् इसाबेलाचा धमाका! मुंबईच्या 'या' रल्वे स्टेशनवर केला बोल्ड डान्स, सर्व प्रवासी बघतच राहिले
त्यांनी एकदा इवांकाबद्दल असंही म्हटलं होतं की, 'माझी मुलगी इवांका 6 फूट उंच आहे, तिची शरीरयष्टी चांगली आहे आणि तिने मॉडेल म्हणून खूप पैसे कमावले आहेत.' डेली स्टारच्या एका वृत्तात म्हटले आहे की 2006 मध्ये एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी 'तिची फिगर चांगली आहे' असे म्हटले होते. 'जर इवांका माझी मुलगी नसती तर मी तिला डेट केलं असते. मात्र, ट्रम्प यांनी हे विनोदी पद्धतीने हे सांगितलं होतं आणि ते अनेकदा आपल्या विनोदी शैलीमुळे चर्चेत राहतात आणि खुलेपणाने वक्तव्ये करतात.
ट्रम्प यांनी इतिहास घडवला
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आवश्यक 270 इलेक्टोरल मतं मिळवली. अमेरिकेत 7 स्विंग राज्ये आहेत, ज्यांचे निकाल महत्त्वाचे ठरतात. या 7 राज्यांमध्ये पेनसिल्व्हेनिया, नॉर्थ कॅरोलिना, जॉर्जिया, मिशिगन, ऍरिझोना, विस्कॉन्सिन, नेवाडा यांचा समावेश आहे. 2020 मध्ये, जो बिडेन यांनी या सातपैकी सहा राज्ये जिंकली होता. पण यंदाच्या निवडणुकीत ट्रम्प या सातही राज्यांत विजयी झाले आहेत.
ADVERTISEMENT