Gold-Silver Rate Today : सणासुदीच्या काळात भारतात सोने- चांदी खरेदी करण्याचा ट्रेंड प्रचंड वाढताना दिसला. यावेळी सोने-चांदीच्या किंमतीने मोठा उच्चांक गाठला होता. त्यामुळे ग्राहकांचं टेन्शन वाढलं होतं. पण, आता दिवाळीनंतर या दरांमध्ये मोठ्याप्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू झालेला असताना ग्राहकांसाठी ही दिलासादायक बातमी ठरत आहे. चला तर मग आजच्या (16 नोव्हेंबर 2024) सोने-चांदीच्या किंमतीतील बदल सविस्तर जाणून घेऊयात. (Gold-Silver prices today 17 november 2024 what are the rates of 24 22 and 18 carat gold mumbai pune nashik nagpur)
ADVERTISEMENT
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे.
हेही वाचा : Govt Job : 'इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात' भरघोस पगाराची सरकारी नोकरी! लगेच करा अर्ज
Goodreturns वेबसाईटनुसार, शनिवारी (16 नोव्हेंबर 2024) 24 carat 10 gm (1 तोळा) सोन्याचा भाव 75,650 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये कोणताही बदल झालेला नसून हे दर स्थिरावले आहेत. त्याचवेळी 22 carat सोन्याचा भाव 69,350 रूपये आहे. तर एक किलो चांदीची किंमत 89,500 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
हेही वाचा : Maharashtra Weather : थंडीचा महिना, धुक्याची चादर अन् पावसाचं संकट! हवामानाचा अंदाज काय?
देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 carat सोन्याचा भाव 80,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
Gold Rate 22, 24, 18 carat in Mumbai
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 69,350 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,650 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,740 रूपये आहे.
Gold Rate 22, 24, 18 carat in Pune
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 69,350 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,650 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,740 रूपये आहे.
Gold Price 22, 24, 18 carat in Nagpur
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 69,350 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,650 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,740 रूपये आहे.
10gm 22, 24, 18 carat in Nashik
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 69,380 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,680 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 56,770 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
22 carat सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 carat सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT