Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट? वाचा IMD रिपोर्ट

रोहिणी ठोंबरे

14 Nov 2024 (अपडेटेड: 14 Nov 2024, 04:02 PM)

Maharashtra weather update News Today 14 Nov 2024 : राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून तापमानामध्ये सतत बदल होताना दिसत आहेत. राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी कोरडे हवामान अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून तापमानामध्ये सतत बदल

point

राज्यातील 'या' भागात हवामानाचा अंदाज काय?

point

कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?

Maharashtra Weather IMD Alert Report : राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून तापमानामध्ये सतत बदल होताना दिसत आहेत. राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी कोरडे हवामान अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थंडीमुळे दिलासा मिळाला आहे. पण काही भागात अजूनही अवकाळी पावसाचं संकट आहे. हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना या संदर्भात इशारा दिला आहे हे सविस्तर जाणून घ्या. (maharashtra weather forecast update Today 14 november 2024 winter season minimum temperature IMD report mumbai pune kolhapur nagpur)

हे वाचलं का?

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हा दबाव वाढल्याने याचा परिमाण इतर राज्यावरील हवामानावर होणार आहे. महाराष्ट्रावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठे थंडी तर कुठे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा : Pankaja Munde : 'कटेंगे तो बटेंगे' घोषणेची महाराष्ट्रात... पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याची चर्चा, नेमकं काय म्हणाल्या?

राज्यातील 'या' भागात हवामानाचा अंदाज काय?

कोकण वगळता राज्यात बहुतांश भागात किमान तापमानात घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक कडाक्याची थंडी पडली आहे. त्याचवेळी, दक्षिण महाराष्ट्रामध्ये आज (14 नोव्हेंबर 2024) ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही वाचा : Priya Sarvankar Vs Amit Thackeray : नेता म्हटलं तर कर्तृत्व, वकृत्व, नेतृत्व हवं, नवा चेहरा द्यायला हा सिनेमा आहे का?

Weather of these City Maharashtra:रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर, रायगड, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

    follow whatsapp