Shree Kala Ram Mandir : अयोध्येसह देशात सर्वत्र सध्या राम मंदिराच्या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरु आहे. अयोध्येमध्ये (Ayodhya) राम मंदिराचा 22 जानेवारी रोजी अभिषेक होत आहे. त्यामुळे रामलल्लाच्या अभिषेकची तयारीही जय्यतपणे केली जात आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भक्तही आपापल्या पद्धतीने श्रीरामाविषयी आपली भावना व्यक्त करणार आहेत. त्यातच अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिराच्या ‘प्राण-प्रतिष्ठा’ सोहळ्याच्या 10 दिवसाआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काळाराम मंदिरामध्ये आल्याने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
ADVERTISEMENT
गोदावरी काठी वसलं मंदिर
एकीकडे अयोध्येत राम मंदिराची जोरदार तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील कार्यक्रमाच्या 11 दिवसाआधीच काळाराम मंदिरातून विशेष कार्यक्रमांना प्रारंभ करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमधील गोदावरीच्या काठी वसलेल्या काळाराम मंदिरामध्ये दाखल झाल्याने या दौऱ्याची विशेष चर्चा केली जात आहे. काळाराम मंदिर हे नाशिकच्या पंचवटी परिसरात असून तेही त्याचीही मोठी ख्याती असल्याचे सांगण्यात येते.
‘ते’ 5 वटवृक्ष
पंचवटीला विशेष महत्व यासाठी आहे की, रामायणातील अनेक घटना येथे घडल्या आहेत. रामायणातील संदर्भानुसार प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी पंचवटीतील या परिसरात असलेल्या दंडकारण्य जंगलामध्ये काही वर्षे घालवली आहेत. पंचवटीचा अर्थ सांगताना असा सांगितला जातो की, 5 वटवृक्षांची जमीन म्हणजे पंचवटी असंही सांगितलं जाते. प्रभू श्रीरामाने येथ आपली झोपडी बांधली होती, त्यामुळे या परिसरात असलेल्या 5 वटवृक्षांमुळेच तो परिसरही शुभ मानला जातो.
हे ही वाचा >> ‘संजय राऊत म्हणजे थुकलेले पान’, भाजप आमदार नितेश राणेंकडून जहरी टीका
काळी पाषाणाची मूर्ती
नाशिक शहरामधील पंचवटी परिसरात काळाराम मंदिर असून ते एक जुने हिंदू मंदिर आहे. भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासाच्या काळातील काही दिवस पंचवटी परिसरात घालवले होते. काळाराम मंदिर हे नाशिकसर परिसरातील हे खास मंदिर मानले जाते. मंदिराच्या गर्भगृहात काळ्या पाषाणाच्या मूर्तीच्या रूपात येथे राम विराजमान झाले आहेत. या मंदिरामध्ये भगवान श्रीरामाबरोबरच माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींचीदेखील स्थापना केली आहे.
12 वर्षानंतर झाली निर्मिती
या मंदिराविषयी माहिती सांगताना असं सांगितलं जाते की, सरदार रंगारू ओढेकर नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात प्रभू श्रीराम आले होते. त्यावेळी त्यांना गोदावरी नदीत काळ्या रंगाची मूर्ती तरंगताना दिसली. त्यानंतर ते नदीकाठावर पोहचले तेव्हा त्यांना तिथे खरच रामाची मूर्ती तरंगताना दिसली, आणि ती मूर्ती खरच काळ्या रंगाची होती. नदीत तरंगताना दिसलेली ती मूर्ती नंतर मंदिरात आणून बसवण्यात आली. हे मंदिर 1782 साली बांधले असून पूर्वी हे मंदिर लाकडापासून बनवलेले मंदिर होते. खरं तर हे मंदिर बनवण्यासाठी 12 वर्षे लागली होती.
ADVERTISEMENT