Maharashtra Weather : महाराष्ट्रात पाऊस बॅकफुटवर? गुलाबी थंडीचे वेध... पाहा IMD चा अंदाच

रोहिणी ठोंबरे

26 Oct 2024 (अपडेटेड: 26 Oct 2024, 10:45 AM)

Maharashtra Weather Update : महाराष्ट्राला परतीच्या पावसानं झोडपून काढलं आहे. त्याचवेळी राज्यातील काही भागात अजूनही पाऊस सुरूच असून याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात हवामानाचा अंदाज काय?

point

दिवाळीनंतर थंडीचे वेध...

point

आज 'या' भागांना मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : महाराष्ट्राला परतीच्या पावसानं झोडपून काढलं आहे. त्याचवेळी राज्यातील काही भागात अजूनही पाऊस सुरूच असून याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे. अशातच आता दिवाळीचा सण काही दिवसांवर आलेला असताना पाऊस जाणार की राहणार? असा मोठा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला तर, मग आजचा (26 ऑक्टोबर 2024) हवामानाचा अंदाज जाणून घेऊया. (maharashtra weather update today 26 october imd report will rain remain in diwali know when the winter will start)

हे वाचलं का?

राज्यात हवामानाचा अंदाज काय?

राज्यात अनेक ठिकाणी आता पावसाने विश्रांती घेतली आहे. आज आणि उद्या दोन दिवस राज्यात कोरडं हवामान राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे उष्णता वाढू शकते. पण काही भागात पावसाच्या सरी बरसण्याचीही शक्यता आहे. त्याचबरोबर दिवाळीतही पुन्हा पावसाचं संकट आहे.

हेही वाचा : Shiv Sena UBT Candidate List : शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी 'सामना'तून जाहीर! वाचा एका क्लिकवर...  

दिवाळीनंतर थंडीचे वेध...

28 आणि 29 ऑक्टोबर रोजी हवामान विभागाने पुन्हा मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी पावसात जाऊ शकते. तसेच, गुलाबी थंडीचेही वेध लागले आहेत. दिवळीनंतर राज्यात थंडीची हुडहुडी जाणवणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आज 'या' भागांना मुसळधार पावसाचा इशारा

आज महाबळेश्वर, पुण्यातील घाटमाथ्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परभणी आणि कोल्हापूरमध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हेही वाचा : Horoscope In Marathi : सूर्यासारखं चमकेल 'या' राशींचं भाग्य! दिवाळीआधीच काही राशी होतील मालामाल

विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. सोमवारपासून (28 ऑक्टोबर) राज्याच्या काही जिल्ह्यांत विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

    follow whatsapp