Pahalgan Terror Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. बर्फाच्या डोंगरात घोडेस्वारी करणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 12 लोक जखमी झाले आहे,अशी सूत्रांची माहिती आहे. जखमींमध्ये चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजते. पुण्यातील एका कुटुंबातील पाच जणांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. दरम्यान जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT
बैसरन परिसरात काही पर्यटक घोडेस्वारी करत डोंगरभागात जात होते. त्याचदरम्यान, लपलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोर आर्मी किंवा पोलिसांच्या वर्दीत होते. त्यामुळे त्यांना कोणी ओळखू शकला नाही. या हल्ल्यात फक्त पर्यटकांनाच गोळी लागली नाही. तर अनेक घोडेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. हल्ला झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. पर्यटन त्यांच्या जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळून जात होते.
पुण्यातील कुटुंबावर दहशतवाद्यांनी केला गोळीवर
पुण्यातील एका कुटुंबातील पाच जणांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. एका व्यक्तीला तीन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर उर्वरित नागरिकही जखमी झाले आहेत.
हे ही वाचा >> Pune News : वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू! बेजबाबदार डॉक्टरवर गुन्हा दाखल
जखमी झालेल्या पर्यटकांची नावे
विनोद भट - (गुजरात)
मनिक पाटील
रिनो पांडे
एस बालचंद्रू - (महाराष्ट्र)
डॉ. परमेश्वर
अभिजावन राव कर्नाटक
संत्रू - तामिळनाडू
शशी कुमारी - ओरिसा.
असावरी जगदाळे - महाराष्ट्र
प्रगती जगदाळे - महाराष्ट्र
संतोष जगदाळे - महाराष्ट्र
कौस्तुभ गनबोटे - महाराष्ट्र
संगीता गनबोटे - पुणे
हे ही वाचा >> UPSC Result 2024 Shakti Dubey: UPSC परीक्षेत संपूर्ण देशात पहिली आलेली 'शक्ती' आहे तरी कोण?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे TRF (The Resistance Front) नावाचा दहशतवादी तंजीमचा हात आहे. दोन ते तीन हल्लेखोर पोलीस आणि आर्मी युनिफॉर्ममध्ये होते. ही घटना घडल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं. सीआरपीएफची क्विक रिअॅक्शन टीम (QAT) ला तातडीनं रवान करण्यात आलं. संपूर्ण परिसराता सील करण्यात आलं आहे.
भातप नेते रविंदर रैना यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, पाकिस्तानी दहशतवादी आपल्या सैनिकांचा सामना करू शकत नाहीत. त्यामुळे पर्यटकांना निशाणा बनवत आहेत. पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनीही या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत पीडित पर्यटकांचं सांत्वन केलं आहे.
ADVERTISEMENT
