बसमध्ये कपलचे सुरु होते शरीरसंबंध! नवी मुंबईच्या तरुणाने गुपचूप बनवला व्हिडीओ, नंतर जे घडलं...

Navi Mumbai Couple Viral Video : नवी मुंबईत एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. धावत्या बसमध्ये एका कपलने सेक्स केल्याचं वहायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

Couple In NMMT Bus Viral Video

Couple In NMMT Bus Viral Video

मुंबई तक

• 04:37 PM • 22 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

कपलचा बसमधील रोमॅन्टिक व्हिडीओ तुफान व्हायरल

point

बस कंडक्टरने दिलं स्पष्टीकरण

point

पनवेलहून कल्याणला जात होती बस

Navi Mumbai Couple Viral Video : नवी मुंबईत एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. धावत्या बसमध्ये एका कपलने सेक्स केल्याचं वहायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन मंडळ्याच्या एसी बसमध्ये (NMMT) ही धक्कादायक घटना घडली. कपल बसमध्ये मागच्या बाजूला बसले होते आणि शरीरसंबंध करत होते. तेव्हा दुसऱ्या वाहनात बसणाऱ्या एका व्यक्तीने त्यांचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ 22 सेकंदांचा होता. कपलच्या रोमान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. 

हे वाचलं का?

रिपोर्टनुसार, जेव्हा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. तेव्हा त्यांनी तातडीनं कारवाई केली. बसमध्ये लगेच ठेवण्याच्या जागेवर हा सर्व प्रकार घडला. एनएमएमटीच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने म्हटलं की, बसच्या कंडक्टरविरोधात कारवाई सुरु करण्यात आली आहे. कंडक्टरने या घटनेला रोखण्यासाठी काहीही केलं नाही. यामुळे त्याच्यावर कारवाई होत आहे.

हे ही वाचा >>  UPSC Result 2024 Topper List: UPSC निकाल जाहीर, पाहा IAS टॉपर्सची संपूर्ण यादी

बस कंडक्टरने दिलं स्पष्टीकरण

अधिकाऱ्यांनी बस कंडक्टरचं नाव जाहीर केलं नाही. त्यांनी म्हटलं की, कंडक्टरला सूचना देण्यात आली आहे. त्यांच्याकडून लेखी स्वरुपात उत्तर मागण्यात आलं आहे की, त्यांच्या ड्युटी दरम्यान अशाप्रकारचं कृत्य घडलं कसं? अधिकाऱ्यांनी हे सुद्धा सांगितलं की, कंडक्टर बसमध्ये पुढे बसला होता. मागे काय घडत होतं, त्याबाबत त्याला कळलं नाही.

पनवेलहून कल्याणला जात होती बस

राज्याचे आरटीआय कार्यकर्ता अनारजित चौहान यांनी प्रकरणाबाबत म्हटलं की, बस पनवेलहून कल्याणला जात होती आणि त्या बसमध्ये जास्त गर्दी नव्हती. ट्रॅफिक खूप जास्त असल्याने बस स्लो चालली होती. तेव्हा दुसऱ्या वाहनात बसणाऱ्या व्यक्तीने या कपलच्या रोमान्सचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर त्याने तो व्हिडीओ अधिकाऱ्यांना पाठवला. 

हे ही वाचा >> Today Gold Price: विषयच संपला... ज्याचा विचार कधीही केला नव्हता तेच झालं, सोन्याचा आजचा भाव पाहूनच जाल हादरून!

काय बोलले अधिकारी?

अनारजित चौहान यांनी म्हटलं की, कंडक्टरला बेजबाबदारपणामुळे दोषी ठरवलं आहे. सार्वजनिक परिवहनमध्ये अशाप्रकारचं कृत्य करणं बेकायदेशीर आहे. एनएमएमसीचे कमिश्नर कैलाश शिंदे यांच्यासोबत चर्चा झालेली नाही.

    follow whatsapp