vijay wadettiwar: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यानंतर मराठी क्रांती मोर्चाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज (Lathi charge) केला. त्या लाठीहल्यात अनेकजण जखमी झाले. त्यानंतर जरांगे पाटील यांचे आंदोलन पेटले आहे. तर आज जरांगे-पाटील यांनी आज सायंकाळी पाच पर्यंत सरकारने अध्यादेश काढावा, नाही तर पाण्याचाही त्याग करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तर दुसरीकडे मात्र काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला आरक्षण देत असाल तर ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) टक्का वाढवा. आणि टक्का वाढवून देत नसाल तर आम्हा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ देणार नाही असं स्पष्ट मत विजय वडेट्टीवार यांनी मांडले आहे. त्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्यावरून हे राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा
मनोज जरांगे-पाटील यांनी एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागण्यासाठी बेमुदत उपोषण केले आहे. त्यातच जरांगे-पाटील यांनी आज सायंकाळपर्यंत मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली. मात्र आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला आरक्षण देत असाल तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच सरकार जर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवून देणार नसेल तर ओबीसीमधून आरक्षण देऊ देणार नाही नसल्याची ठाम भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे.
हे ही वाचा >> Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा शिंदे सरकारला अल्टिमेटम! घेणार मोठा निर्णय
आरक्षण देऊ देणार नाही
जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाला सुरुवात झाल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच आता ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्याने डोकं वर काढले आहे. त्यामुळेच विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे.
मूळ मागणी कुणबी जात प्रमाणपत्राची
मराठा समाजाला आरक्षण देत असाल तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चाललेल्या आंदोलनाची मूळ मागणी ही कुणबी जात प्रमाणपत्राची आहे. मात्र ओबीसी समाजाचे आरक्षण न वाढवता जर प्रमाणपत्र दिली गेली तर मात्र जीवात जीव असे पर्यंत ओबीसी समाजाच्या मूळ आरक्षणाला धक्का लावू देणार नाही अशी भूमिका विजय वडेट्टीवार केली आहे.
मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्या आल्यानंतर आता देण्यात येणारे मराठा समाजाच्या आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. त्यामुळे आता ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा वर आला आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी बोलताना सांगितले की, जर ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा टक्का न वाढवता आरक्षण देण्यात येणार असेल तर तो ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे. त्यामुळे हे सरकार ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.
हे ही वाचा >> Aditya-L1 Mission : ISRO ने दिली गुड न्यूज! सूर्याच्या दिशेने भारताचं आणखी एक पाऊल
मराठा समाजाला माझं समर्थन
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना स्पष्ट सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देत असाल तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, सरकार जर ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवत असेल तर माझी मराठा आरक्षणाला विरोध नाही अस स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
ADVERTISEMENT