IPL 2025 Kl Rahul Video Viral : एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगला. के एल राहुलच्या वादळी खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीवर दमदार विजय मिळवला. राहुलने या सामन्यात नाबाद 93 धावांची तुफानी खेळी केली. परंतु, दिल्लीने आरसीबीचा पराभव केल्यानंतर के एल राहुलने मैदानात भन्नाट सेलिब्रेशन केलं. राहुलने मैदानात केलेल्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
राहुलने आरसीबी विरुद्ध नाबाद 93 धावांची खेळी केली होती. यामुळे दिल्लीने आरसीबीवर रोमहर्षक विजय मिळवला. परंतु, राहुलने सामना जिंकल्यानंतर मैदानात एक सर्कला केला आणि त्या सर्कलमध्ये बॅट जोराट आपटली आणि चिन्नास्वामी स्टेडियन होम ग्राऊंड असल्याचा मेसेज क्रिडा विश्वात पोहोचवला. के एल राहुलने अनोख्या पद्धतीने केलेलं सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरला आहे.
हे ही वाचा >> अजितदादांच्या मुलाला क्लिन बोल्ड करणारी ऋतुजा पाटील आहे तरी कोण?, जय पवारांची कशी पडली विकेट?
के एल राहुलने केला मोठा खुलासा
के एल राहुलने मागील काही वर्षांमध्ये आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केलीय. परंतु, राहुलला काही सामन्यांमध्ये धावांचा संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे क्रिडा विश्वातून त्याच्यावर टीका टीप्पणीही करण्यात आली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राहुलने आयपीएलमध्येही फॉर्म कायम ठेवला आहे. आरसीबी विरोधात झालेल्या सामन्यातही राहूलने धावांचा डोंगर रचला.
आरसीबी विरुद्ध राहुलने धावांचा पाऊस पाडल्यानंतर दील्ली कॅपिटल्सने एक्सवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राहुलने म्हटलंय, माझ्यासाठी ही एक स्पेशल जागा आहे. मी जे सेलिब्रेशन केलं आहे, ते माझा आवडता मूव्ही कांतारामधील आहे. हा मैदान आणि ही जागा अशी आहे, जिथे मी मोठा झालो आहे. ते माझं होम ग्राऊंड आहे.
हे ही वाचा >> Thane: अचानक आला अन् 'त्या' मुलीला भररस्त्याच... इंजिनिअरिंगला असलेल्या तरुणाने केलं नको ते!
दिल्ली विरुद्ध प्रथम फलंदाजी करत बंगळुरु संघाने 20 षटकात 7 विकेट्स गमावत 163 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करून दिल्लीने 17.5 षटकात 6 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात के एल राहुलने 53 चेंडूत नाबाद 93 धावांची खेळी केली.
ADVERTISEMENT
