Viral Video: जयपूर: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, करण जोहर, करीना कपूर खान आणि कार्तिक आर्यनसारखे सिने स्टार हे IIFA 2025 साठी जयपूरला पोहोचले आहेत. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण सर्वात जास्त व्हायरल होणारा व्हिडिओ म्हणजे शाहिद कपूर आणि करीना यांची भेट. 17 वर्षांच्या ब्रेकअपनंतर दोघेही एकमेकांना अत्यंत आनंदाने भेटले. ज्याचा Video सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
ADVERTISEMENT
करीनाची शाहीदला मिठी अन् VIDEO Viral
व्हायरल व्हिडिओमध्ये, बेबोने शाहिदला मिठी मारली आणि त्याच्याशी तिने हसत-हसत गप्पाही मारल्या. दोघांनाही पाहून असं वाटत होतं की, जणू ते एखाद्या जुन्या विषयावर चर्चा करत आहेत. या सुंदर क्षणानंतर, बेबोने करण जोहरला मिठी मारली आणि कार्तिक आर्यनशीही गप्पा मारल्या.
हे ही वाचा>> Crime : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर पुष्पा स्टाईल कारवाई, 25 कोटी रुपयांचे चंदन जप्त; पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आरोपी अटक
करिना आणि शाहिदला अशा प्रकारे एकत्र पाहून चाहते उत्साहित झाले. एका यूजर्स लिहिले, 'व्वा, हे अद्भुत आहे... जेव्हा जुने प्रेमी भेटतात... तेव्हा असेच घडते.' दुसऱ्या एका यूजरने लिहिले, “मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. 17 वर्षांनी एकत्र.” दुसऱ्या यूजरने लिहिले, “जब वी मेट अगेन.”
या कार्यक्रमात बॉबी देओल, विजय वर्मा, माधुरी दीक्षित, श्रेया घोषाल सारखे इतर सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. 2006 मध्ये वेगळे होण्यापूर्वी शाहिद कपूर आणि करीना कपूर अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.
हे ही वाचा>> Marathi Population in Mumbai: मुंबईत किती मराठी आणि किती गुजराती? ही आकडेवारी पाहून तुम्हीही...
करीना आणि शाहिद यांनी 2004 ते 2007 पर्यंत एकमेकांना डेट केले होतं. दोघेही त्यांच्या नात्याबाबत अत्यंत सीरियस होते. दोघांनीही फिदा, चुप चुप के आणि जब वी मेटसारख्या हिट सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. 'जब वी मेट' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच दोघांचे ब्रेकअप झाले आणि काही वर्षांनी करीनाने सैफ अली खानशी लग्न केले.
दरम्यान, शाहिदच्या आयुष्यात मीराचा प्रवेश झाला. पण आता हे दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. असं असलं तरी सध्या व्हायरल होणाऱ्या त्यांच्या व्हिडिओमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
ADVERTISEMENT
