Nashik Accident Video : महाराष्ट्रात हिट अँड रन घटनांची मालिकाच सुरू आहे. पुण्यातील कल्याणीनगरच्या घटनेनंतर नागपूरमध्ये अशीच घटना घडली. त्यानंतर मुंबईत शिवसेना नेत्याच्या मुलाने वरळीत महिलेला चिरडले. या घटनांमुळे राज्यात खळबळ उडालेली असतानाच आता नाशिकमध्ये एका पादचारी महिलेला भरधाव कारने उडवल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Woman Died in hit and run case in Nashik)
ADVERTISEMENT
अर्चना किशोर शिंदे (वय ३६) असे कारच्या धडकेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. हिट अँड रनची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
नाशिक हिट अँड रन... नेमके काय घडले?
नाशिकमधील बारदान फाटा येथील हॉटेलमधील काम आटोपून मयत अर्चना शिंदे या शिवाजीनगर येथील घरी निघाल्या होत्या. रस्त्याच्या कडेने जात असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.
पाठीमागून आलेल्या मारूती अल्टो कारने जोरात अर्चना शिंदेंना धडक दिली. त्या लांब जाऊन पडल्या. अपघातानंतर चालक कार घेऊन फरार झाला. दरम्यान, घटनास्थली असलेल्या नागरिकांनी अर्चना शिंदे यांना रुग्णालयात दाखल नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी देवचंद रामु तिदमे याला ध्रुवनगर येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. अपघात घडला त्यावेळी मद्यपान करून तो कार चालवत होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT