Kolhapur rain update Today : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात, तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळतोय. संततधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. शहराच्या आजूबाजूला पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली असून, शहरातील अनेक भागात पाणी साचले. कोल्हापुरात पावसामुळे कशी स्थिती निर्माण झाली होती, पहा व्हिडीओ
ADVERTISEMENT
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. 28,29 जुलै रोजी कोल्हापूरमधील काही भागात मध्यम, काही भागांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिला तर कोल्हापुरात पूर परिस्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT