महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भेटा गावात एक सुन्न करणारी घटना घडली आहे. एका ७० वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. ही महिला भेटा, भादा या गावांमध्ये काम करून आपले घर चालवत असे. मात्र 23 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता कामासाठी बाहेर पडल्यावर ती परतली नाही. तिचा मृतदेह एका घरात सापडला. महिलेच्या मुलाने घटनास्थळी पोहोचल्यावर मृतदेह आपल्या आईचा असल्याचे ओळखले. महिलेच्या मुलाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी मन्सूर सादिक होगाडे या ३५ वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटकेत घेतले आहे.
लातूरमध्ये ७० वर्षीय महिलेवर अत्याचार करुन हत्या
मुंबई तक
28 Aug 2024 (अपडेटेड: 28 Aug 2024, 09:00 AM)
लातूरमधील औसा तालुक्यात एक ७० वर्षीय महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. महिलेचा मृतदेह गावात सापडल्यावर मुलाने तिची ओळख पटवली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT