पुण्यातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील भवानी पेठेतील डीपी शहाणी नवहिंद हायस्कूलमध्ये दहावीत शिकणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. पीडितेने 15 ऑगस्ट रोजी घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पीडित मुलगी शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील वॉशरूममध्ये तिची विसरलेली बॅग घेण्यासाठी जात होती. यावेळी ती पहिल्या मजल्यावरून चढत असताना देवराजने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तसेच, प्रायव्हेट पार्ट्स बळजबरीने दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पिडित तरुणीने सांगितले. पीडित मुलगी सातवीत शिकते. आरोपी हा त्याच शाळेचा विद्यार्थी आहे. देवराज पदम आगरी (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. शाळेच्या स्वच्छतागृहाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पुण्यात शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार
मुंबई तक
21 Aug 2024 (अपडेटेड: 21 Aug 2024, 08:27 AM)
पुण्यातील शाळेत १९ वर्षीय विद्यार्थ्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना. आरोपीला अटक.
ADVERTISEMENT