Modi Cabinet : निवडणूक न लढवता लागली 'लॉटरी'! 11 जण थेट मोदींच्या मंत्रिमंडळात 'मंत्री'

मुंबई तक

• 03:33 PM • 10 Jun 2024

Modi New Cabinet 2024 : मोदींच्या मंत्रिमंडळात ११ असे मंत्री आहेत, ज्यांनी लोकसभा निवडणूकच लढवली नाही. निर्मला सीतारमन यांनी तर निवडणूक लढवण्यासही नकार दिला होता.

11 नेत्यांनी लढवली नाही, लोकसभा तरीही मिळाले केंद्रीय मंत्रिपद.

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ११ राज्यसभा सदस्यांना संधी.

follow google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक न लढवलेले नेते बनले केंद्रीय मंत्री

point

मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यसभेचे खासदार असलेल्यांना संधी

point

11 नेते कोण आहेत, ज्यांनी मोदींसोबत घेतली शपथ

PM Modi Cabinet 2024 Full list of Council of Ministers : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेत आले आहे. मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. यावेळच्या मंत्रिमंडळाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ज्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही, त्यांनाही मंत्रि‍पदाची लॉटरी लागली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात 11 असे नेते आहेत, ज्यांना निवडणूक न लढवताच मंत्रिपद मिळाले आहे. (11 leader who not contested election but get cabinet berth)

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर तब्बल 71 मंत्र्‍यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यात 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. पण, यावेळी 11 असे नेते मंत्री बनले आहेत, ज्यांनी निवडणूकच लढवली नाही. 

गेल्यावेळी मंत्री असलेले, पण राज्यसभा सदस्य असलेल्या नेत्यांना भाजपने लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले होते. त्यापैकी अनेकजण पराभूत झाले. तर काही विजयी झाले. जिंकून आलेल्या अनेकांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं, तर नारायण राणे हे कॅबिनेट मंत्री होते, पण यावेळी लोकसभा निवडणूक जिंकूनही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. 

आता लोकसभा निवडणूक न लढवता केंद्रीय मंत्री झालेले 11 नेते कोण, याबद्दल जाणून घ्या.

एस. जयशंकर 

गेल्या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असलेल्या एस. जयशंकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. जयशंकर हे गुजरातमधून राज्यसभेचे सदस्य आहेत. परराष्ट्र मंत्री होण्यापूर्वी ते परराष्ट्र सचिव होते.

हेही वाचा >> असे आहे मोदींचे मंत्रिमंडळ, वाचा संपूर्ण यादी 

जे.पी. नड्डा 

भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचाही मंत्रिमंडळात समावेश आहे. २०१९ पासून नड्डा हे भाजपचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळ जून अखेरीस संपत आहे. यापूर्वी 2014-2019 मध्ये नड्डा हे मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. 

निर्मला सीतारमन 

2019 ते 2024 या कार्यकाळात केंद्रीय अर्थमंत्री राहिलेल्या निर्मला सीतारमन यांनी 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्या कर्नाटकातून राज्यसभेच्या सदस्य आहे. त्यांनी सलग तिसऱ्यांदा मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. 2017 ते 2019 या काळात त्या सरंक्षण मंत्री होत्या.

हेही वाचा >> एकही खासदार नसताना मोदी मंत्रिमंडळात आठवलेंची सीट का असते फिक्स? 

अश्विनी वैष्णव 

1994 च्या बॅचचे ओडिशा केडरचे आयएएस अधिकारी असलेल्या अश्विनी वैष्णव यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रि‍पदाची संधी मिळाली आहे. वैष्णव हे ओडिशातून राज्यसभेचे सदस्य आहेत. गेल्या सरकारमध्ये ते रेल्वे मंत्री होते. 

रामदास आठवले

नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून आठवले कायम मंत्रिमंडळात आहेत. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही आठवले रिंगणात नव्हते. त्यांना पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री बनवण्यात आले आहे. आरपीआय (ए)चे अध्यक्ष असलेले आठवले तीन वेळा लोकसभेचे सदस्य राहिलेले आहेत. 

जयंत चौधरी

एनडीएतील घटक पक्ष आरएलडीचे नेते जयंत चौधरी यांनीही मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. ते राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) झाले आहेत. 2022 पासून ते उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे सदस्य आहेत. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे ते नातू असून, अजित सिंह यांचे सुपूत्र आहेत. 

एल. मुरुगन 

नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात एल. मुरुगन यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. मध्य प्रदेशमध्ये राज्यमंत्री होते. एल. मुरुगन हे आधीही केंद्र सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. 

रामनाथ ठाकूर 

जेडीयूच्या कोट्यातून रामनाथ ठाकूर यांना मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री बनवले गेले आहे. ते बिहारच्या राजकारणातील एक मोठा चेहरा आहे. राज्यसभा सदस्य असलेले रामनाथ ठाकूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचे सुपूत्र आहेत. 

सतीश चंद्र दुबे

मोदींच्या मंत्रिमंडळात सतीश चंद्र दुबे राज्यमंत्री म्हणून काम करणार आहेत. ते बिहारमधून भाजपचे राज्यसभा सदस्य आहेत. 

पबित्रा मार्गेरिटा 

आसाममधून भाजप राज्यसभा खासदार असलेल्या पबित्रा मार्गेरिटा यांना मंत्रि‍पदाची संधी मिळाली आहे. आसाम भाजप सोशल मीडिया प्रमुख म्हणून काम केलेल्या मार्गेरिटांना थेट मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. 

हरदीप सिंह पुरी

मोदींच्या मंत्रिमंडळात हरदीप सिंह पुरी कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणार आहेत. ते उत्तर प्रदेशातून राज्यसभा सदस्य आहेत. मागच्या सरकारमध्य हरदीप सिंह पुरी हे पेट्रोलियम मंत्री होते. 
 

    follow whatsapp