PM Modi cabinet portfolio list : महाराष्ट्रातील मंत्र्यांना मिळाली 'ही' खाती, शिवसेनेला कोणते खाते?

मुंबई तक

10 Jun 2024 (अपडेटेड: 10 Jun 2024, 08:41 PM)

pm modi cabinet portfolios announced : मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रतापराव जाधव, रामदास आठवले, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांची वर्णी लागलेली आहे. त्यांना कोणती खाती मिळाली वाचा...

महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांना कोणती खाती मिळाली?

मोदी मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर.

follow google news

बातम्या हायलाइट

point

मोदींच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

point

महाराष्ट्रातील ६ मंत्र्यांना कोणती खाती मिळाली?

point

मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंंना कोणत्या खात्याचे मंत्री?

PM Modi cabinet portfolio list : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार देशात सत्तेत आले आहे. ९ जून रोजी मोदींसह ७२ मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्यानंतर आज (१० जून) खातेवाटप करण्यात आले असून, महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांना महत्त्वाची खाती मिळाली आहेत. विशेषतः पहिल्यांदाच मंत्री बनलेल्या प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांना कोणती खाती मिळणार याचे उत्तरही अखेर मिळाले आहे. (Portfolis of Union Minister nitin Gadkari, Raksha khadse, prataprao Jadhav, ramdas Athawale, murlidhar mohol and Piyush goel)

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा मंत्री आहेत. यातील गेल्यावेळी मंत्री असलेल्या नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि रामदास आठवले यांच्याकडील खाती कायम ठेवण्यात आली आहेत. 

केंद्रीय मंत्री आणि मंत्रालय
नितीन गडकरी रस्ते विकास आणि महामार्ग मंत्रालय
पीयूष गोयल वाणिज्य आणि उद्योग
मुरलीधर मोहोळ सहकार आणि नागरी उड्डाण मंत्रालय
रक्षा खडसे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय
प्रतापराव जाधव आयुष मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
रामदास आठवले सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय

मुरलीधर मोहोळांना भाजपकडून ताकद 

पुण्याचे माजी महापौर असलेल्या मुरलीधर मोहोळ यांची लॉटरीच लागली आहे. खासदारकीच्या पहिल्याच टर्मला मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.

 

पश्चिम महाराष्ट्रातून लोकसभेत पोहोचलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडे भाजपने महत्त्वाची खाती दिली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण सहकाराभोवतीच फिरते. अशा वेळी मुरलीधर मोहोळ यांना सहकार खात्याचे राज्यमंत्री करत भाजपने ताकद दिल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा >> निवडणूक न लढवता लागली 'लॉटरी'! 11 जण थेट मोदींच्या मंत्रिमंडळात 'मंत्री'

शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन खाती

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पद मिळाले आहे. स्वतंत्र कार्यभार म्हणून प्रतापराव जाधव यांना आयुष मंत्रालय मिळाले आहे. त्याचबरोबर आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणूनही ते काम पाहणार आहे.

हेही वाचा >> शिंदेंच्या शिवसेनेवर भाजपकडून अन्याय; खदखद आली चव्हाट्यावर 

शिंदेंच्या शिवसेनेचे सात खासदार आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, असे बोलले जात होते. पण, त्यांना स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्रीपद दिले गेले आहे. यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आता खात्याबद्दल शिवसेनेतून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्त्वाचे असणार आहे. 

 

    follow whatsapp