पुणे: पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेले दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर हे एक अग्रगण्य वैद्यकीय केंद्र आहे, जे गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून रुग्णसेवा देत आहे. 2001 मध्ये स्थापन झालेले हे हॉस्पिटल आज पुण्यातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलपैकी एक आहे, जिथे 800 हून अधिक बेड्स आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, काल (3 मार्च) घडलेल्या एका घटनेने या रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
ADVERTISEMENT
हॉस्पिटलचा इतिहास
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना मंगेशकर कुटुंबाने केली, जे भारतीय संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. या हॉस्पिटलचे नाव मराठी रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यसंगीतकार आणि हिंदुस्तानी शास्त्रीय गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे. लता मंगेशकर फाऊंडेशनची स्थापना ऑक्टोबर 1989 मध्ये मंगेशकर कुटुंबाने केली होती. या फाऊंडेशनला महाराष्ट्र सरकारने हॉस्पिटलच्या उभारणीसाठी 6 एकर जमीन उपलब्ध करून दिली.
हे ही वाचा>> जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा? भाजप आमदाराच्या PA च्या पत्नीचा मृत्यू, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर गंभीर आरोप
लता मंगेशकर फाऊंडेशनने ज्ञान प्रबोधिनी मेडिकल ट्रस्टच्या सहकार्याने हे हॉस्पिटल उभारले. 1 नोव्हेंबर 2001 रोजी हॉस्पिटलने आपले कार्य सुरू केले. सुरुवातीपासूनच या हॉस्पिटलचा उद्देश हा सर्वसामान्यांना दर्जेदार वैद्यकीय सेवा कमी खर्चात मिळावी, हा मुख्य हेतू होता.
मात्र, भाजप आमदार अमित गोरखे यांच्या पीएच्या पत्नीला प्रसूतीसाठी 10 लाख रुपयांची अनामत रक्कम जमा करण्यास रुग्णालयाने सांगितलं. ही रक्कम जमा न करू शकल्याने रुग्णालयाने महिलेला दाखल करून घेतलं नाही. ज्यानंतर प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्राव झाल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच घटनेमुळे आता दिनानाथ रुग्णालयाबाबत सवाल विचारले जात आहे.
हे ही वाचा>> Pune : लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी झुडपात सापडला तरूणीचा मृतदेह, पोलीस चौकशीत समोर आली खळबळजनक घटना
दरम्यान, 2019 मध्ये या हॉस्पिटलवर जमीन कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप झाला होता. पुण्याच्या आयुक्तांनी लता मंगेशकर फाऊंडेशन आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नोटीसही बजावली होती, कारण हॉस्पिटलने कमीतकमी दरात वैद्यकीय सुविधा देण्याच्या कराराचे पालन न केल्याची तक्रार रमेश धर्मावत यांनी केली होती.
पुण्यातील प्रतिष्ठीत रुग्णालय
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे एक मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, जे कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, स्त्रीरोग, यूरोलॉजी, ऑन्कोलॉजी, नेत्ररोग आणि ENT यांसारख्या अनेक वैद्यकीय शाखांमध्ये सेवा देते.
हॉस्पिटलमध्ये 65 हून अधिक ICU बेड्स आहेत, जे गंभीर रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याशिवाय, हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा जसे की रक्तपेढी, कर्करोग संशोधन केंद्र आणि पुण्यातील पहिले मानव दूध बँक यांचा समावेश आहे. दीनानाथ मंगेशकर हे जे समाजातील सर्व स्तरांतील लोकांना वैद्यकीय सेवा पुरवत असल्याचं नेहमी म्हटलं जातं.
हॉस्पिटलला मिळालेली नवीन जमीन
फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला पुण्यातील एरंडवणे येथे नाममात्र 1 रुपयात शासकीय जमीन देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. हा निर्णय हॉस्पिटलच्या विस्तारासाठी आणि अधिक रुग्णांना सेवा देण्यासाठी घेण्यात आलेला आहे. मात्र, ज्या पद्धतीने रुग्णालय प्रशासना पैशांसाठी लोकांच्या जीवाचाही कदर करत नाही. ते पाहता सरकारने घेतलेल्या निर्णयाचा त्यांना पुर्नविचार करणं भाग आहे.
2001 मध्ये स्थापन झाल्यापासून या हॉस्पिटलने अनेक रुग्णांना नवजीवन दिले आहे. मात्र, कालच्या महिलेच्या मृत्यूच्या घटनेने आणि जमीन कराराच्या उल्लंघनासारख्या वादांमुळे हॉस्पिटलच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT
