Lok Sabha Election 2024 Gajanan Kirtikar: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या ईडी चौकशीवरून सध्या बरंच राजकारण सुरू आहेत. त्यातच त्यांचे वडील खासदार गजानन किर्तीकरांनी ईडीच्या मुद्द्यावरून भाजप आणि पंतप्रधान मोदींना खडे बोल सुनावले. त्यामुळे आता भाजपने देखील गजानन किर्तीकरांवर प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
'गजानन किर्तीकर हे केवळ शरीराने एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. मनाने ते अजूनही ठाकरेंसोबतच आहेत..' असं विधान भाजपचे आमदार अमित साटम यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप हे आता आमनेसामने आले आहेत.
भाजप आमदार अमित साटम नेमकं काय म्हणाले?
असे वाटते की, गजानन कीर्तिकर यांचे शरीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहे आणि आत्मा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत आहे. एकदा त्यांनी ठरवावे की ते कुणाबरोबर आहे. मोदींचा चेहरा वापरून भाजप कार्यकर्त्यांच्या जीवावर दोनदा खासदार झाले.
ईडीपासून घाबरण्याची गरज भ्रष्टाचाऱ्यांना आहे. जर कर नाही तर डर कशाला? अमोल किर्तीकर यांच्या अकाउंटमध्ये खिचडीच्या कंत्राटदाराकडून 95 लाख रुपये आलेच का? याचे उत्तर द्यावे! भ्रष्टाचारियो की खैर नही! कार्यवाही तो होगी ही! असं विधान आमदार अमित साटम यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT