North Mumbai Lok Sabha : भाजपसाठी 'हा' फॅक्टर ठरणार डोकेदुखी?

मुंबई तक

• 06:15 PM • 16 May 2024

भाजपसाठी सगळ्यात सुरक्षित असणाऱ्या मतदारसंघांमध्ये उत्तर मुंबईचा समावेश होतो. यंदा मात्र अंतर्गत धुसफूस भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जातेय. इथ याधी गोपाळ शेट्टी खासदार होते. भाजपमधून कुणाचाही विरोध नसल्यानं पुन्हा एकदा गोपाळ शेट्टी यांनाच उमेदवारी मिळेल हे निश्चित मानलं जात होतं.

follow google news

Maharashtra Lok Sabha election 2024 : (लखन आदाटे) मुंबईतील उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून भाजपनं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उतरवलंय,तर काँग्रेसनं भूषण पाटील यांच्या रुपानं नवा चेहरा दिलाय. आजपर्यंत भाजपचाच बोलबाला राहिलेल्या उत्तर मुंबईतील लढाई यावेळी एका फॅक्टरमुळे अधिक रंगलीय. मतदारसंघातील लढतीचे चित्र बदलणारा हा  फॅक्टर कोणताय
हेच आपण जाणून घ्या. (which Factor will change result in north Mumbai lok sabha)

हे वाचलं का?

देशभरातील लोकसभा निवडणुका आता शेवटच्या टप्प्यात आल्यात. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील मतदानही या शेवटच्या टप्प्यातच पार पडतंय. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आता मायानगरीकडे आहेत. उत्तर मुंबईतून एका केंद्रीय मंत्र्यांविरोधात काँग्रेसकडून उमेदवार जाहीर होताच सुरुवातीला मतदारसंघात वेगळीच चर्चा रंगली होती.

इथं ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर लढतील अशी चर्चा होती.मात्र जागावाटपात ही जागा काँग्रेसकडे गेली.तगडा उमेदवार नसल्यानं घोसाळकरांनी काँग्रेसकडून हाताच्या चिन्हावर निवडणूक लढावं अशी ऑफरही होती.

सुरुवातीला चर्चेत असणारं अस्लम शेख यांचं नावही मागे पडलं. अखेर भूषण पाटील यांच्या रुपानं मराठी चेहरा उतरवत काँग्रेसनं सेफ खेळी केल्याची चर्चा रंगलीय.

उत्तर मुंबईतला प्रचार शिगेला पोहोचत असतानातच मराठी विरुद्ध गुजराती असा रंग येतोय.मराठी मतदार ज्या उमेदवाराला पसंती देतील त्या उमेदवाराचा विजय निश्चित असं इथलं चित्र आहे. 

ऐन निवडणुकीत  हा मराठी फॅक्टर केंद्रस्थानी आल्यानं आतापर्यंत एकतर्फी वाटणाऱ्या लढाईत रंगत आलीय.इथ गुजराती-मारवाडी मतदारांची संख्या मोठी असली तरी निर्णायक नाही.

मुस्लीम आणि खिश्चन अल्पसंख्याक समाज आधीपासूनच काँग्रेससोबत आहे. उत्तर भारतीय मतांची दोन्ही पक्षात विभागणी झालीय.त्यामुळे उरलेली 50 टक्के मराठी मतं कुणाकडे जातात यावरच विजयाचं गणित अवलंबुन असेल. 

हा M फॅक्टरच गोयल यांना अडचणीत आणू शकतो.हाच धागा पकडत रॅप साँग आणि जाहिरांतींच्या माध्यमातून मराठीचा मुद्दा अधोरेखित करत भूषण पाटलांनी गोयल यांच्यावर वार करायला सुरुवात केलीय. त्यामुळे वरकरणी ही लढत गोयल यांच्यासाठी सहज आणि सोपी वाटत असली तरी भूमिपूत्र विरुद्द उपरा, मराठी-अमराठी हे प्रचारातील मुद्दे गोयल यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.

मराठी मतंच निर्णायक ठरणार असल्यानं भाजप आणि काँग्रेसनं मराठीबहूल भागात प्रचाराचा जोर वाढवलाय. उत्तर मुंबईत वाहतुकीचा प्रश्न, झोपडपट्ट्या आणि जुन्या चाळींचा प्रश्न वर्षानुवर्षे रखडलेलाच आहे. मात्र पियूष गोयल यांचा प्रचार मोदींची गॅरंटी याभोवतीच फिरतोय.
 

    follow whatsapp