Malaika Arora father Suicide : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी इमातीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. पत्नीसोबत विभक्त झाल्यानंतरही अनिल अरोरा कुटुंबीयांशी खूप जोडलेले होते. ते त्यांच्या किती जवळ होते हे तुम्ही या फोटोंमध्ये पाहू शकता. (malaika arora Father anil arora suicide see how close he was to his family even-after separation Inside Story)
ADVERTISEMENT
अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू होते. ते मूळचे पंजाबमधील फाजिल्का येथील होते. फाजिल्का भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर आहे. येथून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानची सीमा सुरू होते.
मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते. त्यांचा विवाह मल्याळी ख्रिश्चन असलेल्या जॉयस पॉलीकार्पशी झाला होता. ज्या मलायका आणि अमृता अरोराच्या आई आहेत.
जेव्हा मलायका अरोरा 11 वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अभिनेत्री तिची बहीण आणि आईसोबत चेंबूर येथे शिफ्ट झाली.
मलायका अरोरा तिची बहीण अभिनेत्री अमृता अरोरा आणि आईसोबत चेंबूर येथील वसंत टॉकीज येथील बोरला सोसायटीमध्ये राहू लागली.
मलायकाने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, आई-वडील विभक्त झाल्यानंतर तिने तिच्या आईला खूप संघर्ष करताना पाहिलं आहे. ती आपल्या आईकडून वर्क एथिक शिकली. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी सकाळी सर्व काही विसरून कशी नवीन सुरूवात करायची हे देखील ती तिच्या आईकडूनच शिकली असल्याचं तिने सांगितलं.
मलायका अरोराचे वडील पत्नीपासून वेगळे झाले असले तरी ते पत्नी आणि दोन्ही मुलींसोबत अनेक कार्यक्रम आणि सण साजरे करायचे.
अनिल अरोरा आणि त्यांची पत्नी जॉयस पॉलीकार्प हे दोघं एकमेकांपासून वेगळे झाले होते पण तरीही एकमेकांच्या खूप जवळ होते.
या फोटोंमध्ये असे दिसून येते की अनिल अरोरा यांचं मुली आणि पत्नीसोबत खूप चांगलं बॉंडिंग होतं. ते जवळपास प्रत्येक कार्यक्रमांना एकत्र यायचे, भेटायचे.
ADVERTISEMENT