Arjun Kapoor Visits Malaika Arora House Video : अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांच्या आत्महत्येमुळं संपूर्ण बॉलिवूड हादरून गेला आहे. बुधवारी अनिल अरोरा यांनी वांद्रे येथील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं. या दुख:द घटनेमुळं फिल्म इंडस्ट्रीसह अरोरा कुटुंबात शोककळा पसरली आहे. अभिनेता अर्जुन कपूरनेही मलायकाच्या घरी भेट देऊन अरोरा कुटुंबीयांचं सांत्वन केलं. अर्जुन कपूरचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. (Actor Arjun Kapoor consoled the Arora family by visiting Malaika Arora House. Arjun Kapoor's video is going viral on the internet)
ADVERTISEMENT
"अनिल अरोरा यांचा मृतदेह मिळाला आहे. ते सहाव्या मजल्यावर होते. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. आम्ही कसून तपास करत आहोत. फॉरेन्सिक टीमही आली आहे. अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे", अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. मलायका अरोराच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी बॉलिवूडचे कलाकार तिच्या घरी पोहोचले आहेत. अरबाज खाननेही अरोरा कुटुंबीयांची भेट घेतली. तसच अभिनेता अर्जून कपूर आणि इतर सेलिब्रिटींनी अरोरा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! ऑनलाईन फॉर्मची प्रक्रिया बंद! आता 'असा' करावा लागेल अर्ज
प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरावर दुख:चा डोंगर पसरला आहे. मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पण या आत्महत्येचं कारण काय? असा सवाल अनेकांना पडला आहे. याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आली नाही. पोलिसांकडून याप्रकरणी कसून चौकशी केली जात आहे.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरु केला आहे. आता पोलिसांच्या तपासात कोणती माहिती उघड होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मलायका अरोराच्या वडिलांच्या आत्महत्येची बातमी समोर येताच मलायकाचा पहिला पती अरबाज खान सर्वात आधी मलायकाच्या घरी पोहोचला. ज्या ठिकाणी तिच्या वडीलांनी आत्महत्या केलीय. अरबाजचा खानचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT