Bigg Boss Marathi 5 Grand Finale : बाईईई...हा काय प्रकार? बिग बॉसने निक्कीलाच दाखवला बाहेरचा रस्ता

मुंबई तक

06 Oct 2024 (अपडेटेड: 06 Oct 2024, 08:50 PM)

Nikki Tamboli Eliminate : बिग बॉसचं अख्ख घर डोक्यावर घेणारी आणि घरात तुफान राडा करणारी निक्की तांबोळी घराबाहरे पडली आहे. टॉप थ्रीमध्ये एलिमिनेशन पार पडलं होत्. यामध्ये अभिजीत सावंत, सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळी होती. या तिघांमधून आता निक्की तांबोळीला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

bigg boss marathi season 5 grand finale nikki tamboli eliminate abhijeet sawant suraj chavan react top two bigg boss who will won bigg boss trophy

बिग बॉसने निक्कीलाच दाखवला बाहेरचा रस्ता

follow google news

बातम्या हायलाइट

point

बिग बॉसच्या घरातून निक्की तांबोळी बाहेर

point

अभिजीत आणि सूरज पोहोचले टॉप 2 मध्ये

point

अभिजीत आणि सूरज मधून कोण जिंकणार ट्रॉफी

Nikki Tamboli Eliminate : बिग बॉसचं अख्ख घर डोक्यावर घेणारी आणि घरात तुफान राडा करणारी निक्की तांबोळी घराबाहरे पडली आहे. टॉप थ्रीमध्ये एलिमिनेशन पार पडलं होत्. यामध्ये अभिजीत सावंत, सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळी होती. या तिघांमधून आता निक्की तांबोळीला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. (bigg boss marathi season 5 grand finale nikki tamboli eliminate abhijeet sawant suraj chavan react top two bigg boss who will won bigg boss trophy) 

हे वाचलं का?

बिग बॉस मराठीच्या घरातलं हे शेवटचं एलिमिनेशन होतं. या एलिमिनेशनसाठी बिग बॉसने फायनलसाठी महाचक्रव्युह आणलं होतं. या चक्रव्युहमध्ये अभिजीत, सूरज आणि निक्की या तीनही सदस्यांना तीन खुर्च्यावर बसवण्यात आलं होतं. या तीनही खुर्च्या फिरणार आहेत. आणि जो सदस्य दरवाजा समोर येईल तो घराबाहेर पडणार होता. त्यानुसार निक्की समोरील दरवाजा उघडला होता. त्यामुळे निक्की तांबोळी घराबाहेर पडली आहे. त्यामुळे अभिजीत, सूरज हे दोन सदस्य टॉप 2 मध्ये पोहोचले आहेत. 

हे ही वाचा : Mumbai Local : बाईईई हा काय प्रकार? भरगच्च गर्दीत लोकलमध्ये महिला खेळल्या गरबा; Video व्हायरल

किती प्राईज मनी मिळणार?

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाच्या विजेत्यासाठी 25 लाख रुपये बक्षीस ठेवण्यात आलं होतं, पण घरातील सदस्यांनी वेगवेगळ्या टास्कमध्ये ही रक्कम जिंकावी लागणार होती. यानंतर बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी चक्रव्यूह टास्कमध्ये 25 लाख रुपयांपैकी 8.6 लाख रुपये जिंकले होते. त्यानंतर पहिल्या तिकीट टू फिनालेच्या टास्कनंतर बिग बॉस मराठी सीझन 5 च्या विजेत्याला मिळणाऱ्या बक्षिसाच्या रक्कमेत वाढ झाली. या टास्कमध्ये स्पर्धकांना त्यांची किंमत ठरवायची होती. जो सदस्य टास्क जिंकेल त्याची किंमत बक्षिसाच्या रकमेत वाढवण्यात येणार होती. सूरजने हा टास्क जिंकल्यावर त्याची किंमत सहा लाख रुपये बक्षिसाच्या रकमेत जमा झाल्याने बिग बॉस मराठी विजेत्याच्या बक्षिसाठी रक्कम आता 14.6 लाख रुपये झाली आहे.

    follow whatsapp