Bigg Boss Marathi 5 : बाईईई... छोट्या पुढारीचं वय आणि शिक्षण जाणून बसेल धक्काच!

रोहिणी ठोंबरे

• 06:33 PM • 28 Aug 2024

Ghanshyam Darode : आपल्या बोलण्याच्या पुढारीपणामुळे प्रसिद्ध झालेला घनश्याम दरोडे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतो. आज आपण त्याचं वय आणि शिक्षणाबद्दल काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी जाणून घेऊयात.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

बिग बॉस मराठी सीझन 5 ची सध्या जोरदार चर्चा होत आहे

point

छोट्या पुढारीने कितवीपर्यंत शिक्षण घेतलंय?

point

घनश्याम दरोडे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतो.

Big Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी सीझन 5 ची सध्या जोरदार चर्चा होत आहे. रितेश देशमुख पहिल्यांदा होस्ट करत असलेला हा मराठी रिअॅलिटी शो तुफान गाजतोय. सगळीकडे निक्की, अरबाज, छोटा पुढारी आणि सुरज चव्हाण यांचा गुलीगत बोलबाला आहे. आपल्या बोलण्याच्या पुढारीपणामुळे प्रसिद्ध झालेला घनश्याम दरोडे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतो. मूर्ती लहान पण कीर्ति महान हे वाक्य छोट्या पुढारीसाठीच बनलं असावं. आज आपण त्याचं वय आणि शिक्षणाबद्दल काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी जाणून घेऊयात. (Bigg Boss Marathi Season 5 You will be shocked to know the age and education of the chota pudhari Ghanshyam Darode)     

हे वाचलं का?

छोट्या पुढारीने कितवीपर्यंत शिक्षण घेतलंय?

छोटा पुढारी अर्थात सर्वांचा आवडता घनश्याम दरोडे हा बिग बॉस मराठी 5 मध्ये धमाकेदार गेम खेळताना दिसत आहे. छोट्या पुढारीची उंची 3 फूट 7 (112 सेमी) इंच आहे. तो बिग बॉसच्या घरात सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या सदस्यांपैकी एक आहे. 

हेही वाचा : Sindhudurga: राजकोटवर राडा, राणेंच्या बालेकिल्ल्यात भर पावसात ठाकरेंचं तडाखेबदं भाषण!

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण छोट्या पुढारीचे शिक्षण हे पदवीपर्यंत झाले आहे. म्हणजेच छोटा पुढारी हा पदवीधर आहे. घनश्यामचे बोलण्यावरही चांगलेच प्रभुत्व आहे . तो दिसण्यात जरी लहान मुलांसारखा दिसत असला तरीही तो 22 वर्षांचा आहे. त्याला वाचनाची प्रचंड आवड आहे. 

हेही वाचा : Viral Video: फ्लाइटमध्ये सगळ्यांसमोर तरूणीने अचानक केलं Kiss, हजारो फूट उंचीवर असं घडलं तरी काय?

बिनधास्त बेधडक स्वभावामुळे घनश्याम दरोडे लहानग्या वयातच प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याला छोटा पुढारी म्हणून ओळखू जाऊ लागलं. नं छोट्या पुढारीची सोशल मीडियावरही जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आता येणाऱ्या आठवड्यांमध्ये तो काय धमाका करणार हे पाहण्यासारखं असणार आहे. 

    follow whatsapp