Ketaki Chitale : ''प्रधानमंत्रीजी, हमे हिंदू राष्ट्र चाहिए'', अभिनेत्री केतकी चितळेची मोदींकडे मागणी

Ketaki Chitale social media post : काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर देखील तिने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, काल वैष्णव देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यामुळे कुठे आहे ऑल आईज ऑन रफाह वाले लोक? हिंदु राष्ट्राची आमची मागणी पूर्ण करा, अशी मागणी देखील केतकी चितळे हीने केली आहे.

अभिनेत्री केतकी चितळे हिने पंतप्रधानांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ketaki chitale social media post we want hindu rashtra prime minister ketaki chitale demand pm narendra modi

मुंबई तक

• 04:27 PM • 11 Jun 2024

follow google news

Ketaki Chitale social media post : वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरं तर केतकी चितळे हीने एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये ''हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी'', अशी मागणी केतकी चितळे  (Ketaki Chitale) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना करताना दिसली आहे. या पोस्टची आता सोशल मीडियावर चर्चा आहे. (ketaki chitale social media post we want hindu rashtra prime minister ketaki chitale demand  pm narendra modi)

हे वाचलं का?

केतकी चितळेच्या पोस्टमध्ये काय?

अभिनेत्री केतकी चितळे हिने पंतप्रधानांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर ''हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी'' असे कॅप्शन लिहण्यात आले आहे. तिच्या या पोस्टच काही जण समर्थनही करतायत. तर काही जण तिला सोशल मीडियावर ट्रोलही करू लागले आहेत. त्यामुळे केतकी चितळेची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे.

दरम्यान याआधी काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर देखील तिने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, काल वैष्णव देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यामुळे कुठे आहे ऑल आईज ऑन रफाह वाले लोक? हिंदु राष्ट्राची आमची मागणी पूर्ण करा, अशी मागणी देखील केतकी चितळे हीने केली आहे.

केतकी चितळेच्या या पोस्टवर आता लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. तसेच या पोस्टवरून तिचे समर्थन ही केले जाते आहे, आणि तिला ट्रोल करण्याचा देखील प्रकार सूरू आहे.

    follow whatsapp